आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटातून बाहेर पडण्यासाठी:श्रीलंकेत परदेशात जाणाऱ्या महिलांच्या वयोमर्यादेत घट

कोलंबो6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक संकटाचा मुकाबला करणाऱ्या श्रीलंकेने महिलांनी परदेशात जाणे व तेथे काम करण्यासाठी वयोमर्यादेत घट केली आहे. पूर्वी सुरक्षेच्यादृष्टीने २३ वर्षे अनिवार्य हाेते. आता त्यात घट करून ते २१ वर्षे करण्यात आले आहे. देशाची ढासळती आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परदेशातून येणारे डाॅलर श्रीलंकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला आधार देतील, असे सरकारला वाटते.

२०१३ मध्ये श्रीलंकेने परदेशात काम करणाऱ्या महिलांवर निर्बंध घातले हाेते. त्याचवर्षी साैदी अरेबियात लहान मुलांचे संगाेपन करणाऱ्या १७ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली हाेती. कारण तिच्या देखरेखीखाली एका मुलाचा मृत्यू झाला हाेता. या महिलेला दिलेल्या शिक्षेवरून नाराजीनंतर श्रीलंकेने परदेशात जाण्यासाठी महिलांना २३ वर्षांची अट घातली हाेती. साैदीसाठी किमान वय २५ वर्षे करण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...