आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Campaign To Defend Donald Trump's Lies, Midterms In November, Preparations Begin, Opposition Candidates In The Fray

कवायत:डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोटेपणापासून बचावाचे अभियान, नोव्हेंबरमध्ये मध्यावधी, तयारीला सुरुवात, विरोधी उमेदवार रिंगणात

चार्लाेट अल्टर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

५२ वर्षीय एड्रियन फाॅर्टेस फीनिक्स येथे आपल्या कार्यालयाजवळील रेस्तरांमध्ये दुपारच्या जेवणासाठी जातात. तेव्हा त्यांना बहुदा काेणीही आेळखत नसावे. ते या वयात आपल्या जीवनातील महत्त्वाचा सामना करण्याची तयारी करत आहेत. अमेरिकेतील अॅरिझाेना राज्याच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट पदाची निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदार नाेंदणी, मतदान यंत्रांची तपासणी, निवडणूक निकालाची पुष्टी देणे इत्यादी कामे या पदावरील व्यक्तीला पार पाडावी लागतात. २०२२ मध्ये या पदाचे महत्त्व खूप वाढले. फाॅर्टेस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिपब्लिकन पार्टीचे मार्क फिनचेम रिंगणात आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीतील घाेटाळ्याच्या निराधार आराेपांचे फिनचेम समर्थन करतात. अमेरिकेची पुढील निवडणूक घेण्याची जबाबदारी दिली जाईल, अशा अनेक रिपब्लिकन उमेदवारांपैकी ते एक आहेत.

यात विजयी उमेदवाराकडे आगामी निवडणुकीला सुरुंग लावण्याचे व्यापक अधिकार असतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. एखादा धूर्त निवडणूक अधिकारी मतदान माेजणी राेखू शकताे. किंबहुना निवडणुकीचा निकालदेखील फिरवू शकताे. अमेरिकेतील निवडणूक यंत्रणा उद्ध्वस्त हाेण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आघाडीच्या सरकारी पातळीवरील व्यक्तींमध्ये फाॅर्टेस यांचा समावेश हाेता. ते धाेरणकर्ते किंवा जाेरदार भाषण ठाेकणारे नेते नव्हे तर अधिकारी आहेत. ते डेमाेक्रॅटिक व रिपब्लिकन आहेत. फाॅर्टेस त्यास अनाेखी आघाडी म्हणतात. डाेनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीतील घाेटाळ्याचा आराेप ते फेटाळतात. सेक्रेटरी ऑफ स्टेट पदाची निवडणूक म्हणजे नाेव्हेंबरमध्ये हाेऊ घातलेल्या निवडणुकीचा आत्मा आहे, असे अध्यक्ष जाे बायडेन यांनी म्हटले आहे.

दाेन तृतीयांश मानतात लाेकशाहीसाठी धाेका अमेरिकन जनता मध्यावधी निवडणुकीचे महत्त्व जाणते. क्विनिपीएकच्या पाहणीनुसार दाेन तृतीयांश अमेरिकन म्हणाले, लाेकशाही संकटात आहे. लाेकशाहीवरील संकट असल्याचे एक तृतीयांश लाेकांनी मान्य केले. ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या संसदेवर त्यांचे हजारो समर्थक चाल करून गेले होते. त्यामुळे देशातील एक वर्ग लाेकशाहीच्या सुरक्षेबाबत चिंतित दिसतो. -

बातम्या आणखी आहेत...