आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारी:ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे काेराेना रुग्णांत वाढ नाही, आराेग्य विभागाचा एक आठवड्याच्या अहवालाच्या आधारे दावा

ब्रिटनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णालयात काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. ब्रिटनच्या सार्वजनिक आराेग्य विभागाने ही माहिती दिली. ब्रिटनमधील संसर्गाच्या नव्या रुग्णसंख्येमागे डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचा दावा आतापर्यंत केला जात हाेता. आराेग्य विभागाने २१ जून ते २७ जूनपर्यंतची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार या एका आठवड्यात प्रति एक लाख लाेकसंख्येमागे सरासरी दाेन व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्या. ही संख्या गेल्या आठवड्यातील संख्येएवढी आहे. लसीकरण कार्यक्रमावर भर देण्यात आल्याने लाेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. ब्रिटनमध्ये ७५ टक्के वयस्करांनी काेराेना लसीचा किमान एक डाेस घेतला आहे. त्यात सामील लाेकांत ८० वर्षांहून जास्त वयाचे ९५ टक्के लाेक आहेत.

लसीकरणावरून तरुणांनी मात्र सरकारच्या चिंतेत भर टाकली आहे. ब्रिटनमध्ये ४० वर्षांहून कमी वयाच्या केवळ ३४ टक्के लाेकांनी लसीकरण केले आहे. त्यामुळेच काेराेना संसर्गाचे प्रमाण तरुणांत जास्त आढळून येत आहे. ब्रिटनमध्ये लसीकरण धाेरणाचे प्रमुख मार्काे कॅवेलरी म्हणाले, युराेपीय संघाची मान्यता असलेल्या फायझर-बायाेएनटेक, माॅडर्ना, अॅस्ट्राझेनेका, जाॅन्सन अँड जाॅन्सन डेल्टा व्हेरिएंटच्या विराेधात प्रभावी आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या चार दिवसांपासून २२ हजारांहून जास्त नवे बाधित आढळले आहेत. ब्रिटनमध्ये ३,७२,७४५ सक्रिय काेराेना रुग्ण आहेत.

ब्रिटनमध्ये सुरूवातीला पंतप्रधान जॉन्सन यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले होते. ते सार्वजनिक ठिकाणी विनामास्क दिसून आले. त्यांच्यावर टीकाही झाली होती. परंतु त्यांनी नंतर या महामारीबाबत गांभीर्याने निर्णय घेतल्याने देशात नंतर बदल दिसून आले.

आॅस्ट्रेलियात परदेशी प्रवासी संख्येत कपात
आॅस्ट्रेलियात आता आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणाद्वारे दर आठवड्याला ३ हजार प्रवासी येऊ शकतील. सरकारने या काेट्यात ५० टक्के कपात केली आहे. हा आदेश शुक्रवारपासून लागू झाला आहे. ताे १५ जुलैपर्यंत लागू राहील. त्यानंतर सरकार पुढील धाेरण ठरवणार आहे. आधी दर आठवड्याला ६ हजार प्रवाशांना परवानगी हाेती. हाॅटेलमधील वाढत्या संख्येला राेखणे हा आपला उद्देश असल्याचे पंतप्रधान स्काॅट माॅरिसन यांनी आदेशात म्हटले आहे. येथे ४१६ सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोनाशून्य धोरण लागू आहे.

अमेरिकेतील २० राज्यांची लसीकरण उद्दिष्टपूर्ती
अमेरिकेने ४ जुलैपर्यंत ७० टक्के वयस्करांनी काेराेनाची किमान एक लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले हाेते. देशभरात मात्र नियाेजित कालावधीत उद्दिष्टपूर्ती हाेण्याची चिन्हे नाहीत. परंतु ५० पैकी २० राज्यांनी उद्दिष्ट गाठले आहे. या राज्यांत वाॅशिंग्टन डीसी, कॅलिफाेर्निया, आेरेगन, काेलाेराडाे इत्यादींचा समावेश आहे. राज्यांची संख्या कमी असल्यानेे व्हाइट हाऊसने अभियानाला जास्त गती दिली. बहुतांश राज्यांत नियोजित उद्दिष्टपूर्ती दिलेल्या कालावधीत होऊ शकत नाही, याचे संकेत गेल्या महिन्यात मिळाले हाेते. त्यानंतर व्हाइट हाऊसमधून लसीकरणावर भर दिला.

जगभरात : पाेर्तुगालमध्ये संचारबंदी, स्काॅटलंडमध्ये युराे कपमुळे संसर्गात वाढ
- पाेर्तुगालमध्ये दरराेज रुग्णसंख्या दुप्पट हाेत आहे. डझनावर शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथे १४ दिवसांपासून १६०० रुग्ण आढळले.
- इस्रायलमध्ये एप्रिलनंतर पहिल्यांदा ३०० हून जास्त नवे रुग्ण आढळले.
- युराेपीय फुटबाॅल अजिंक्यपद स्पर्धेतील वाढत्या गर्दीमुळे काेराेना वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे स्काॅटलंडच्या २ हजार प्रेक्षकांना काेराेनाची बाधा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...