आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक देशांत नवा ट्रेंड:पाश्चात्त्य देशांत वधूंच्या जुन्या पोशाखांना मागणी

रिआनोन पिक्टन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅनफ्रान्सिस्कोच्या बेव्हरली यिपला स्वतःसाठी वेडिंग गाऊन शोधण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. त्यांनी अनेक नावाजलेल्या दुकानांत शोध घेतला, पण खूप महागड्या किमतीतही लग्नाचा ड्रेस मिळाला नाही. त्यांनी सेकंड हँड रिटेल विक्रेत्यांकडे शोध सुरू केला. क्वीनली वेबसाइटवर तिला ५०० डाॅलर किमतीचा गाऊन आवडला. त्या २६ जून रोजी त्यांच्या लग्नाच्या दिवशी परिधान तो करतील.

अमेरिका, न्यूझीलंड, ब्रिटनमधील लग्नासाठी वापरलेले कपडे विकणाऱ्या दुकानांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी वधूंसाठी अधिक स्टॉक आहे. वेस्टिएअर या लक्झरी रिटेल वेबसाइटने मार्च २०२० ते मार्च २०२२ दरम्यान लग्नाच्या कपड्यांच्या विक्रीत ५२७ टक्के वाढ नोंदवली आहे. वेबसाइटवर ६० हजार लग्नाचे कपडे आहेत. ब्रायडल रिलिव्हड या ब्रिटनमधील सेकंड-हँड रिटेल स्टोअर चेनच्या केट अॅटकिन्सन सांगतात, विक्रीसाठी इतके विंटेज वेडिंग कपडे यापूर्वी कधीही उपलब्ध नव्हते. महामारीत लग्ने पुढे ढकलल्याने किंवा रद्द झाल्याने लोक आता आधी विकत घेतलेले लग्नाचे कपडे विकत आहेत. खरेदीदारांचीही कमतरता नाही.

बातम्या आणखी आहेत...