आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Demonstration Of Russian Tanks Destroyed In The Ukraine War In Europe; Starting From Poland | Marathi News

युरोपीय संघ सदस्य:युरोपात युक्रेन युद्धात उद्ध्वस्त रशियन रणगाड्यांचे प्रदर्शन; पोलंडमधून सुरुवात

युक्रेन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी युद्धात नष्ट झालेल्या रशियन लष्कराच्या शस्त्रास्त्रांचे युरोपात प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. बर्लिन, पॅरिस, माद्रिद, लिस्बेनला जाण्यापूर्वी वारसॉमध्ये प्रदर्शन होणार आहे. त्याचे संचलनही केले जाणार आहे. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेजनिकोव्ह म्हणाले, फेब्रुवारीत हल्ले सुरू झाल्यापासून रशियाने आतापर्यंत १४७७ रणगाडे तसेच ३५८८ लष्करी वाहने गमावली. काही क्षेपणास्त्रे, जळालेले रशियन रणगाडे इतर लष्करी वाहनांचे कीव्हमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. युरोपीय संघाच्या कार्यकारी शाखेने २७ देशांच्या गटात सामील होण्यासाठी युक्रेनला उमेदवारीचा दर्जा मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे. युक्रेनने अमेरिका तसेच युरोपीय मित्र राष्ट्रांकडे आपल्या सैन्याला जास्त शस्त्रे मिळावीत, असा आग्रह धरला आहे.

विशेष करारांतर्गत भास्करमध्ये

बातम्या आणखी आहेत...