आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात सर्वाधिक वेतन मिळणाऱ्या सीईओंमध्ये पहिले नाव अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांचे येते. त्यानंतर इलॉन मस्क, टिम कुक आणि सत्या नाडेला यांचा समावेश होतो. पण ब्रिटनच्या एका महिला सीईओने वेतनाच्या बाबतीत या सर्वांना मागे टाकले आहे. आॅनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म बेट ३६५ च्या संस्थापक आणि सीईओ डेनिस कोट्स यांना २०२० या आर्थिक वर्षात ४,७५० कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. ५३ वर्षीय कोट्स ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत महिलाही आहेत आणि आता त्यांचा जगातील सर्वाधिक पॅकेज मिळवणाऱ्या सीईओंच्या यादीत समावेश झाला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, कोट्स यांचा जगातील सर्वात श्रीमंत ५०० व्यक्तीत समावेश आहे. गेल्या एक दशकात त्यांनी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. जवळपास दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या बेट ३६५ ला ऑनलाइन गेम बेटिंगमुळे फायदा झाला आहे. कंपनीची नेटवर्थ ३० हजार कोटी रुपये आहे. कंपनीला २०२० मध्ये २८,४०० कोटींचा महसूल मिळाला. तो मागील वर्षाच्या तुलनेत ८% कमी आहे.
अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर कोट्स यांनी वडिलांच्या गॅम्बलिंगच्या दुकानाच्या एका छोट्याशी साखळीच्या अकाउंटंट म्हणून काम केले. २२ व्या वर्षी त्या एमडी झाल्या. दुकानांची संख्या वाढल्यावर त्यांनी व्यवसाय ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. ब्लूमबर्ग वेल्थ इंडेक्समध्ये समाविष्ट १७ अतिश्रीमंत व्यक्तीत कोट्स एकमेव महिला आहेत. त्यात व्हर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅनसन आणि टोटेनहॅम हॉटस्पर फुटबॉल क्लबचे जो लुई यांचा समावेश आहे.
गॅम्बलिंगद्वारे कमाई : कोट्स यांनी सुंदर पिचाईंपेक्षा घेतले दुप्पट वेतन
ब्लूमबर्ग पे इंडेक्सनुसार डेनिस कोट्स यांना ४,७५० रुपये मिळाले, तर अल्फाबेटचे (गुगल) सीईओ सुंदर पिचाई यांना २,१४४ कोटी मिळाले होते. टेस्लाचे सीईओ मस्क यांना ३,५९१ कोटींचे पॅकेज मिळाले होते. अॅपलचे सीईओ टिम कुक यांना ९५७ कोटी रु., तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांना ३०६ कोटी रुपये वेतन मिळाले. कोट्स यांनी कोरोनाशी लढण्यासाठी ब्रिटनच्या सरकारला १०० कोटींपेक्षा जास्त मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.