आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Dentists Leaving Jobs, Appointments To Patients After 3 Years, Least Government Dentists In A Decade, Patients Suffering

ब्रिटनचे हाल:डेंटिस्ट सोडताहेत नोकरी, रुग्णांना तब्बल 3 वर्षांनंतरची अपॉइंटमेंट, एका दशकात सर्वात कमी सरकारी डेंटिस्ट, रुग्ण त्रस्त

लंडन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे त्रस्त असलेल्या ब्रिटनमध्ये आता डॉक्टर्स नोकरी सोडत असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. गेल्या एका वर्षात २००० पेक्षा जास्त डेंटिस्टनी नोकरी सोडली आहे. यामुळे सुमारे ४० लाख रुग्ण प्रभावित झाले आहेत. असोसिएशन ऑफ डेंटल ग्रुप्सने नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (एनएसएस) आकड्यांचा हवाला देत सांगितले, २०२० च्या अखेरीस २३,७३३ डेंटिस्ट होते. २०२१ च्या अखेरीस घटून २१,५४४ राहिले. ही गेल्या एका दशकात डेंटिस्टची सर्वात कमी संख्या आहे. देशाच्या अनेक भागात डेंटिस्टना दाखवण्यासाठी ३ वर्षांपर्यंतच्या अपॉइंटमेंट मिळत आहेत. याबाबत लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. बहुतांश लोकांना दातांच्या शस्त्रक्रियेसाठी आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात जावे लागत आहे. एनएसएसचे डेंटिस्ट मिळत नसल्याने लोक खासगी डॉक्टरांकडे जाताहेत.

हे कारण : एनएसएस डेंटल विभागात बजेट कमी
1 डेंटिस्टच्या कमतरतेसाठी कोरोना महामारी, ब्रेक्झिट आणि सरकारकडून एनएसएस डेंटलला दिला जाणारा कमी निधी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. काही डेंटिस्ट एनएसएसचे संपूर्ण बजेट संपल्याने रुग्णांनाच अतिरिक्त शुल्क मागताना दिसत आहेत.
2 एनएसएसमध्ये डेंटल केअर करारांतर्गत पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप ब्रिटिश डेंटल असोसिएशनने केला आहे. यामुळे अर्ध्या लोकसंख्येलाच दंत आजारांवर उपचार मिळत आहेत. करारांतर्गत १२ वर्षांतही सुधारणा होऊ शकली नाही. यामुळे डेंटिस्ट एनएसएसशी जोडले जाऊ इच्छित नाहीत.

सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण धोक्यात, सुरक्षेची हमीच नाही

सरकारी रुग्णालये रुग्णांचा जीव धोक्यात घालत असल्याचा इशारा ब्रिटनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. ते एनएचएस अनुशेषाकडे इशारा करत म्हणाले, गळके छत, तुटलेल्या लिफ्ट आणि वाॅर्डांमध्ये उंदीर वाढल्याने धोका वाढला आहे. त्यातही वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. रुग्णवाहिकाही बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी महिलांना खासगी वाहनांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांत जावे लागते. ब्रिटनमध्ये महामारीनंतर रुग्णालयांची अवस्था वाइट आहे. तिथे रुग्णांची सुरक्षा धोक्यात आल्याची प्रकरणे ३ पट वाढली आहेत.

खर्च कमी करण्यासाठी अनावश्यक वैद्यकीय चाचण्यांवर लगाम
युरोपियन युनियनकडून देशांतील रुग्णांवर दरवर्षी अनावश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी ११,४०० कोटी रुपये खर्च केला जातो. आरोग्याशी संबंधित डेटा रुग्णांना, वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधकांना चांगल्या पद्धतीने उपल्ब्ध करून देण्यासाठी ईयू अनावश्यक वैद्यकीय चाचण्यांत कपात करू इच्छित आहे. असे केल्यास १० वर्षांमध्ये ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...