आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Depression Is Possible If Children Are Not Playing And Are Not Interested In Recreational Activities; Take Them On The Walk; News And Live Updates

कोरोनाकाळाचे मुलांवर प्रभाव:6-12 वर्षाच्या मुलांमध्ये वाढत आहे उदासीनतेचं प्रमाण; तज्ञ म्हणतात, पालकांनी मुलांना वेळ देत त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात 6-12 वर्षातील मुले हे उदासीनता आणि चिंतेने ग्रस्त आहेत

कोरोना महामारीमुळे जगभरात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, वृद्ध परिस्थितीत कठीण काळातून जात आहे. कोरोनामुळे या स्तरांवरील व्यक्तींमध्ये नैराश्य किंवा उदासीनता आणि चिंता खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. ज्यामुळे जगभरातील लहान मुले आत्महत्यासारख्या पर्यायांचा अवलंब करीत आहे. या परिस्थितीकडे आपल्या पालकांचे लक्ष कमी असल्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

हे प्रमाण वाढत असल्यामुळे डॉक्टरांना वृद्ध आणि लहान मुलांमधील हे प्रमाण सहज ओळखता येत नाही आहे. त्यामुळे मुलांचे आई-वडील आणि डॉक्टर हे चिंतेत असून या या परिस्थितीत त्यांना मदत कशी करावी कळत नाही आहे.

न्यूयॉर्क येथील चाईल्ड माइंड इंस्टीट्यूटचे मानसशास्त्रज्ञ रेचेल बुशमॅन असे म्हणातात की, आम्ही बालपणाला निर्दोषतेशी जोडतो. त्यामुळे मुलांमध्ये उदासीनता वाढत असून 6-12 वयोगटाच्या मुलांमध्ये नैराश्य किंवा उदासीनता दिसायला लागते. परंतु, पुढे चालून याच मुलांना चिंता आणि उदासीनतेचा धोका असतो.

3 वर्षाच्या मुलांमध्ये उदासीनतेचा प्रमाण
एनवाययू लँगो हेल्थ येथील चाइल्ड अँड एडलोसेंट मनोरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. हेलेन एगर याच्या अवहालानुसार, जगभरात तीन वर्षाच्या आतील मुलांमध्येदेखील डिप्रेशन पाहायला मिळत आहे. चिडचिडेपणा आणि राग हे या तीव्र नैराश्याचे लक्षण असून यामुळे मुलांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो.

पालकांनी काय करावे?

  • फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक जोनाथन कोमर असे सांगतात की, जर अशा परिस्थितीत आपल्या मुलांमध्ये असे काही लक्षणे आढळले तर त्याला गंभीरपणे घ्या. मुलांचे लक्ष वेधून घेत त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. त्यांच्याबरोबर मैदानी खेळ खेळा. ज्यामुळे त्यांना ताजी हवा आणि सुर्यप्रकाशामुळे फायदा होईल.
  • लक्षणे किंवा समस्या कायम राहिल्यास आपल्या डॉक्टरांची सल्ला घ्या. कोरोनाकाळात टेलीमेडिसीन हादेखील चांगला पर्याय ठरलेला आहे. समस्यांना वेळेवर ओळखणे हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे.
बातम्या आणखी आहेत...