आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिक घडामोडींचा परिणाम मनावर होतो. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ते मोठे साधन ठरू शकते. म्हणूनच सामूहिक आराधना केल्याने वैफल्यामुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता कमी होते, असा दावा प्रतिष्ठित जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने (जामा) केला. अमेरिकेतील दहा राज्यांतील ४५ ते ६५ वयोगटातील लोकांच्या मृत्युदराच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.
संशोधनानुसार एकट्याने प्रार्थना-आराधना करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्यातून होणाऱ्या मृत्युदरात २ टक्के घट दिसून आली. परंतु चर्चमध्ये जाऊन सामूहिक रूपाने आराधना करणाऱ्या लोकांच्या मृत्युदरात १२ टक्क्यांपर्यंत घट झाली. वैफल्य किंवा निराशेतून येणाऱ्या मृत्युदरात घट होण्यामागे एखादे धार्मिक कारण नाही. परंतु सामूहिक प्रार्थनेच्या निमित्ताने लोकांत मिसळावे लागते. यातून हे घडून येते. धर्म लोकांना एका ठिकाणी एकत्र येण्याची संधी निर्माण करून देतो. चर्चमध्ये प्रार्थनासभेनंतर लोक एकमेकांशी हितगुज करतात. भेटीगाठी घेतात. यातून नैराश्याची पातळी कमालीची घटते. इतर सामान्य कार्यक्रम उदाहरणार्थ चॅटिंग मीटिंग किंवा इतर सभांमध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. परंतु त्याचा परिणाम धार्मिक ठिकाणी आयोजित सभेच्या तुलनेत कमी होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकन राज्य आेहियोमध्ये १० वर्षांदरम्यान नियमितपणे चर्चला जाणाऱ्यांचे प्रमाण १५% वरून ४५% झाले आहे. यामुळे नैराश्य आणि वैफल्यामुळे ४५ ते ६५ वयाेगटात मृत्युदर प्रतिलाख ५४ वरून केवळ दोनवर आला आहे. जामाचे संशोधक टायलर गिल्सनुसार कोरोना काळादरम्यान पाच राज्यांतील १.१० लाख मेडिकल वर्कर्सपैकी ७५ टक्क्यांहून जास्त जणांची सोशल डिस्टन्स्टिंगसह सामूहिक प्रार्थना सुरूच आहे. परिणामी यापैकी कोणत्याही मेडिकल वर्करचा मृत्यू नैराश्य व वैफल्यामुळे झाला नाही. एका इतर संशोधनानुसार अमेरिकेत अजूनही ३३% लोक नियमित चर्चला जात नाहीत. अमेरिकेत ड्रग्जचा आेव्हरडोस, अतिमद्यपान, वैफल्यामुळे होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांबाबत ‘डेथ ऑफ डिस्पेयर’ शब्द गेल्या दशकापासून प्रचलित झाला आहे.
रविवारी दारूची दुकाने सुरू असल्यामुळे चर्चला जाणाऱ्यांची संख्या घटली अमेरिकेत ब्लू लॉ (धार्मिक नियम) लागू असलेल्या राज्यात या नियमाच्या विरोधात मद्याची दुकाने रविवारीही सुरू ठेवली जातात. अशा राज्यांत चर्च जाणाऱ्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. काही राज्यांत ४५ ते ६५ वयोगटातील लोकांचा वैफल्याने होणाऱ्या मृत्यूदरात २ टक्क्यांनी वाढ झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.