आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संबंध:भारतासोबतचे सांस्कृतिक, राजकीय संबंध कायम ठेवण्याची इच्छा - तालिबान; पाक मार्गे व्यापार करण्याचा संघटनेचा प्रस्ताव

लंडन/काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवाई क्षेत्रातून मार्ग खुला ठेवू : स्टानकझई

तालिबानने भारताकडे सहकार्याची मागणी केली आहे. संघटनेचा नेता शेर मोहंमद अब्बास स्टानकझई म्हणाले, भारतासोबत आम्हाला राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संबंध पुढेही कायम ठेवण्याचा आमचा प्रस्ताव आहे. सोशल मीडियावर व्हिडिआे जारी करून स्टनकझईने हे मुद्दे मांडले. अफगाणिस्तानवरील वर्चस्वानंतर भारताबाबत तालिबानच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याने केलेले हे पहिलेच वक्तव्य आहे. स्टनकझईने ४६ मिनिटांच्या या व्हिडिआेतून पश्तून भाषेतून आपली भूमिका स्पष्ट केली.

अफगाणिस्तानसाठी महत्त्वाच्या देशांत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, रशिया व चीन असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. भारत या उपखंड अत्यंत महत्त्वाचा देश आहे. भारत व अफगाणिस्तानचे संबंध पूर्वापार चांगले राहिले आहेत. ते पुढेही कायम ठेवले पाहिजेत. आमच्यासाठी पाकिस्तान मार्गे व्यापार महत्त्वाचा ठरतो. हवाई क्षेत्राद्वारे व्यापार खुला राहील. भारताशी व्यापार दुतर्फा असावा की नाही, हे स्पष्ट नाही. या आधी प्रवक्ता सुहैल शाहीनने भारत संबंधावर मत व्यक्त केले होते.

पंजशीरमध्ये इंटरनेट बंद
तालिबानने माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची सोशल मीडियावरील पोहोच बंद करण्यासाठी पंजशीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा थांबवली आहे. सालेह सोशल मीडियावर तालिबानच्या विरोधात एकजूट वाढवत आहे.

ब्रिटन : अखेरचे उड्डाण, काबूलमधून बाहेर
अफगाणिस्तानात ब्रिटिश सैनिकांची अखेरची खेप घेऊन ब्रिटनने काबूल सोडले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, दोन दशकांत आपण मिळवलेल्या गोष्टी दाखवून देण्याची ही वेळ आहे. अमेरिका वगळता बहुतांश देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची ही मोहीम पूर्ण केली आहे. ब्रिटनने बचाव मोहिमेअंतर्गत अफगाणिस्तानहून १५ हजारांहून जास्त सुखरूप काढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...