आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:बायडेनपेक्षा दहापट जास्त खर्च करूनही पाहणीत ट्रम्प बालेकिल्ल्यांत पिछाडीवर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांचा मेडिकल रिपोर्ट / अँटिबॉडी आैषधी देऊन ट्रम्प यांच्यावर क्लिनिकल ट्रायल

न्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहंमद अली
नवीन पाहणीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या अडचणीत वाढ केलीय. कारण रिपब्लिकन पार्टीचा गड मानलेले टेक्सास, आययोवा, जॉर्जिया सारख्या राज्यांत बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर सात अंकांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या पक्षाला बालेकिल्यांमध्ये प्रचारावरील खर्च अनेक पटीने वाढवावा लागला आहे. टेक्सासमध्ये पक्षाने १९७६ व जॉर्जियात १९९२ याशिवाय कधीही पराभव पाहिला नाही. राष्ट्रीय पातळीवरही अनेक पाहण्यांत बायडेन यांनी आघाडी ठेवली आहे. विन्स्कॉन्सिन, पेनसिल्व्हिनिया, मिशिगन, नेवाडा, आेहिआेसारख्या स्विंग स्टेट्स येथे जय-पराजय ठरतो. या मतदारसंघातही बायडेन यांनी ट्रम्प यांना पिछाडीवर टाकले. २०१६ मध्ये ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये ९.२ अंकांनी विजय मिळवला होता आणि ३८ इलेक्टोरल मते संपादन केली होती. येथे ट्रम्प यांना इतर राज्यांच्या तुलनेत मिळालेला हा मोठा विजय होता. जॉर्जियात ५.७ अंकांनी आघाडी घेत १६ इलेक्टोरल मते मिळवली होती.

टेक्सासमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाने ऑगस्टमध्ये १३ लाख डॉलर खर्च केले. टेक्सासमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीच्या पदाधिकारी मॅनी गर्शिया म्हणाल्या, प्रदेशात े रिपब्लिकन समर्थकांना विजय मिळतो याची खात्री असते. या आधी पक्षाने कधीही एवढी मोठी रक्कम येथील प्रचारावर खर्च केली नव्हती. डेमोक्रॅटिक पार्टीने १.५ लाख डॉलर खर्च केले. त्याबाबत रिपब्लिकनच्या रोना मॅक्डेनियल म्हणाले, आम्ही कोणत्याही राज्याला गृहित धरणार नाहीत. जॉर्जियात ट्रम्प यांच्या पक्षाने सप्टेंबरच्या अखेरीस १२.८ दशलक्ष डॉलर खर्च केले. बायडेन यांनी सुमारे ५० हजार डॉलर खर्च केले.

ट्रम्प यांचा मेडिकल रिपोर्ट / अँटिबॉडी आैषधी देऊन ट्रम्प यांच्यावर क्लिनिकल ट्रायल
७४ वर्षीय ट्रम्प यांना सौम्य ताप आहे. कफाने नाक चोंदलेय. त्यांचे वजन ११० किलोग्रॅम आणि वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे कोरोनाची समस्या वाढू शकते. वाढत्या कोलेस्ट्रेरॉलवर स्टॅटिन व हृदयविकार टाळण्यासाटी अॅस्प्रिन घेत आले आहेत. ट्रम्प यांचे डॉ. शॉन पी. कॉन्ली म्हणाले, अँटिबॉडी आैषधी देऊन क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. त्यांना व्हिटॅमिन डी, झिंक, मेलाटोनिन, फेमोटिडायन, अॅस्प्रिन दिली जात आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या आकडेवारीनुसार ट्रम्प यांचा वयोगटाचे भरती रुग्णांचे प्रमाण ६५ टक्के आहे. पैकी ३२ टक्के लोकांना प्राण गमवावे लागले.

२०१६ मध्ये अंदाज चुकीचे ठरले
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची खरी लढाई स्विंग स्टेट्समध्ये होते. पाहणीत ट्रम्प ८ राज्यांत पिछाडीवर दिसतात. येथे १२५ इलेक्टॉरल व्होट आहेत. २०१६ च्या पाहणीत हिलरी आघाडीवर वाटत होत्या. परंतु, लोकांनी ट्रम्प यांना कौल दिला. ही चूक टाळण्यासाठी एजन्सींनी यंदा जास्तीत जास्त पाहण्यांवर भर दिलाय.

बहुमत असलेल्या पक्षाच्या खात्यावर विरोधी मते
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सर्वात जास्त मते मिळवणाऱ्या उमेदवाराचाच नेहमी विजय होतो, असे नाही. प्रत्येक राज्यात लोकसंख्येच्या दृष्टीने इलेक्टोरल कॉलेज मते तयार केली आहेत. ५० राज्यांतून ५३८ इलेक्टोरल निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल मते असावी लागतात. एखाद्या राज्यात जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला त्या राज्याची इलेक्टोरल मतेही मिळतात. त्याबाबतचा हा नॉलेज रिपोर्ट....

पॉप्युलर मते जास्त मिळाल्यावरही उमेदवार पराभूत होऊ शकतो?
होय. हे शक्य आहे. उमेदवाराला राष्ट्रीय पातळीवर प्रतिस्पर्ध्यांहून जास्त मते मिळाली असतील. कदाचित त्याला २७० एवढी इलेक्टोरल मते मिळालेलीदेखील नसतील.

१९ व्या शतकापासून आतापर्यंत ५ राष्ट्राध्यक्ष कमी मते मिळवूनही पदावर बसले
१९ व्या शतकापासून आतापर्यंत ५ वेळा हे घडले आहे. गेल्या पाच निवडणुकांत तसे दोन वेळा झाले. २०१६ मध्ये राष्ट्रीय पातळीवर हिलरी क्लिंटन यांना ट्रम्प यांच्याहून ३० लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. परंतु त्यांना इलेक्टोरल मते मिळवता आली नव्हती. २००० मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे प्रतिस्पर्धी अल गोर यांना ५ लाखांहून जास्त मते मिळाली होती.

पद्धती का निवडण्यात आली?
१७८७ मध्ये अमेरिकेत संविधान पारित झाले होते. राष्ट्रीय पॉप्युलर मतांच्या आधारे राष्ट्राध्यक्ष निवड अयोग्य ठरते. कारण देश मोठा होता आणि लोकांपर्यंत पोहोचणे कठीण काम होते. त्या वेळी लोक खासदारांद्वारे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या बाजूनेही नव्हते. त्यामुळे इलेक्टोरल कॉलेजची व्यवस्था तयार केली गेली.

निवडून आलेले इलेक्टोरेट पक्षाला मत देण्यास बाध्य नाहीत?
पक्षाला बहुमत मिळालेल्या राज्यातील इलेक्टोरल मतेही आपोआप मिळतात. उदाहरणार्थ- टेक्सासमध्ये एकूण ३८ इलेक्टोरल निवडून आले आहेत. त्यात रिपब्लिकनचे २० इलेक्टोरेट निवडले गेल्यास रिपब्लिकनच्या खात्यात ३८ एवढी संख्या मानली जाईल. एवढे असूनही संविधानानुसार निवडलेल्या इलेकक्टोरेटला विजयी पक्षाच्या उमेदवाराची निवड करणे बंधनकारक नाही. परंतु शिष्टाचारामुळे अशा प्रकारची उदाहरणे कमी दिसतात.

बातम्या आणखी आहेत...