आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी ग्राउंड रिपोर्ट:युद्धाचा प्रसंग असूनही भारतीय समुदाय रशिया सोडण्यास मुळीच तयार नाही

सेंट पीटर्सबर्ग | कसिनीया कोन्ड्रातीवा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवर रशियाचे १६० दिवसांपासून हल्ले सुरू आहेत. त्यातच जगभरातील अनेक देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. म्हणूनच सर्वाधिक निर्बंध असलेला देश अशी रशियाची आेळख बनली आहे. यापूर्वी हा विक्रम इराणच्या नावे होता. या निर्बंधांचा फटका केवळ रशियावरच नव्हे तर तेथे वास्तव्याला असलेल्या भारतीयांनाही बसला आहे. अनेक अडचणी असूनदेखील ते रशिया सोडण्याचा साधा विचारही करत नाहीत. रशियातील व्यावसायिक, अधिकारी, व्यक्तींवर लावलेल्या निर्बंधांमुळे केवळ तेल, गॅस कंपन्या, संरक्षण, बँकिंग क्षेत्र किंवा क्रिमलिनच्या निकटवर्तीय अभिजात वर्गाचेच नुकसान झाले असे नाही, तर सामान्य माणसाचेही नुकसान झाले. अॅपल, अॅडोब, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, सॅप, प्रमुख कार निर्माते, कपडे, व्यक्तिगत देखभाल ब्रँडसह ५०० हून जास्त आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी रशियासोबतचा व्यवसाय सोडला आहे किंवा व्यवहार बंद केला आहे. रशियातील लोक फोन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, शिक्षण, व्यापाराच्या संधी, मनोरंजनासारख्या सुविधांपासून वंचित झाले आहेत. अनेक रशियन उद्योजक देश सोडून निघून गेले आहेत.

परंतु भारतीय त्याच्या अगदी उलट आहेत. भारतीय समुदाय तेथेच राहू इच्छितो. मॉस्कोतील माध्यम व्यवस्थापक दत्तन नायर म्हणाले, नागरिकांची दिनचर्या बिघडली आहे. लोक यूट्यूब, नेटफ्लिक्स किंवा क्लाऊड स्टोअरेज सब्स्क्रिप्शनसाठी पैसे देण्यास असमर्थ आहेत. एवढेच नव्हे तर आवश्यक मीडिया प्लॅटफॉर्मलादेखील सब्स्क्रिाइब करू शकत नाहीत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रम किंवा इंग्रजी भाषेतील बातम्यांच्या संकेतस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हीपीएन सेवेचा वापर करावा लागत आहे. ते अतिशय अस्थिर आहे. कारण रशियन सरकार वेळोवेळी असा सेवा बंद करते. मुले परदेशात राहतात. परंतु त्यांना पैसे पाठवता येत नाहीत. एवढेच नव्हे तर परदेशात एखादा दस्तऐवज पाठवणे हीदेखील मोठी समस्या बनली आहे. रशियातील भारतीय विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय कार्डचा वापर करता येत नाही. अभिषेक म्हणाले, सर्वांनी काही ना काही मार्ग काढला आहे. रुबलमध्ये व्यवहार करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. मला मार्केटिंगमध्ये नोकरी मिळाली. ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. मॉस्कोमध्ये दिशा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रामेश्वर सिंह म्हणाले, २०१४ मध्ये सुरू झालेल्या संघर्षात भर पडली. त्यातून रशिया व भारत यांच्यात लहान व मध्यम व्यवसायांना सुरू करण्यासाठी प्रेरित केले.

युद्धावर मत व्यक्त करणे भारतीय टाळू लागले..तरूण विरोधात युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर रशियात दोन मतप्रवाह दिसतात. सामान्यपणे मुले लष्करी कारवाईला विरोध करत आहेत. आई-वडील या युद्धाचे समर्थक आहेत. भारतीय समुदाय मात्र त्याबाबत मत व्यक्त करणे टाळत आहे. नायर म्हणाले, रशियन मित्रांसोबत आमचा नेहमीच वाद होतो. परंतु आतापर्यंत कुणीही आमचे संबंध तोडलेले नाहीत. अभिषेक मोहंती म्हणाले, मॉस्को व सेंट पीटर्सबर्गसारख्या मोठ्या शहरांतील नागरिकांनी युद्धाला तीव्र विरोध दर्शवला आहे. परंतु अरखान जेल्सक सारख्या लहान शहरांत सरकारचे पाठीराखे मोठ्या संख्येने दिसतात. भारतीय विद्यार्थी समुदायदेखील एकजूट आहे. युरोप, जपानच्या अनेक विद्यार्थ्यांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. संशोधनासाठी आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची मात्र युद्धामुळे गोची झाली आहे. कारण ते रशियात संशोधन करण्यासाठी आले होते. त्यातही या संशोधनासाठी पश्चिमेकडील देशांनी निधी दिला होता.तो निधी थांबला.

बातम्या आणखी आहेत...