आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमार:नजरबंद आँग सान सू यांची एकांत कारावासात रवानगी

यांगूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

म्यानमारमध्ये गेल्या वर्षी तख्तपालटापासून देशाच्या परराष्ट्र मंत्री राहिलेल्या आँग सान सू की काही कर्मचाऱ्यांसह नायपीडॉमध्ये नजरबंद होत्या. जुंता प्रवक्ता जॉ मिन टुन गुरुवारी म्हणाले, सू की यांची नजरबंदीतून एकांत कारावासात रवानगी करण्यात आली आहे. ७७ वर्षीय नोबेल पुरस्कार विजेता सू की यांना अनेक सुनावणींत सहभागी होण्यासाठी सोडण्यात आले आहे. आगामी सुनावणी तुरुंग परिसरातील न्यायालयीन कक्षात होणार आहे. म्यानमारच्या लष्करी सरकारने हजारो लोकशाही समर्थकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून देशात अशांतता आहे. लष्करी राजवटीच्या अत्याचाराला लोकशाहीवादी संघटनांनी तीव्र विरोध केला. परंतु तो दडपण्याचे प्रयत्न झाले.