आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेपाळची राजधानी काठमांडूत दागिने शोधण्याची यात्रा भरते. हे पर्व तुडल देवीचे दागिने शोधण्यासाठी समर्पित आहे. तुडल देवीला वैष्णवीही म्हटले जाते. ही दरवर्षी चंद्र कॅलेंडरच्या चैत्र शुक्ल अष्टमीला असते. यात्रेच्या मुख्य दिवशी तुडल देवीची मूर्ती रथात बसवून बुलावातार मंदिरातून अाणली जाते. या वेळी हजारो भाविक रथ ओढत बालूवातार मंदिरात बागमती नदीकिनाऱ्याजवळील तलावात जमा होतात. भाविक गहना पोखरीपर्यंत(दागिन्यांचा तलाव) जाऊन रस्त्यात ज्याच्या घराच्या दरवाज्याच्या चौकटी लाल मातीने लिंपलेल्या आहेत,त्याच्यासमोर रथ थांबवला जातो.
यानंतर भक्त देवीला प्रसाद अर्पण करतात.प्रसादांत रथावर धरलेली एक विशेष छत्री असते. रथ गहना पोखरीत येतो तेव्हा लोक हातात एक चांदीचा खांब घेऊन तलावाला तीन प्रदक्षिणा घालतात. यानंतर मशाल घेतलेला व्यक्ती तलावाच्या दिशेने निघाल्यावर मागोमाग रथ नेला जातो. तीन प्रदक्षिणा घातल्या जातात. तलावातून तुडल देवीचे दागिने सापडल्यावर देवी देबाली तेथे पोहोचते.
तुडल देवी आणि तिच्या तीन बहिणी महालक्ष्मी, मनामाइजू आणि नुवाकोटदेवी पोहत होत्या तेव्हा देवीचे पोखरीत दागिने हरवले होते,अशी आख्यायिका आहे. तेव्हा अंधार होत हाेता आणि देवीचे घर लांब होते. तीन देवी घरी परतल्या मात्र, तुडल देवी दागिने शोधत राहिली. यासाठी ही यात्रा भरते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.