आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत सन २०२० मृत्यूंच्या आकडेवारीच्या दृष्टीने असामान्य राहिले. जेव्हापासून कोरोनाला सुरुवात झाली तेव्हापासून इतर वर्षांच्या तुलनेत ३ लाख ५६ हजार मृत्यू जास्त झाले. मात्र, सर्व मृत्यूंचा थेट संबंध कोरोनाशी नाही. सरासरीपेक्षा सुमारे एक चतुर्थांश जास्त मृत्यू मधुमेह, अल्झायमर, उच्चरक्तदाब, न्यूमोनियासारख्या कारणांनी झाले आहेत. ही माहिती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीच्या न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या विश्लेषणातून दिसून आली आहे. वृत्तानुसार यातील काही मृत्यू अप्रत्यक्षपणे कोविड-१९ शी संबंधित असू शकतात. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवरील वाढलेला ताण आणि इतर रुग्णांची आधीसारखी काळजी न घेतली गेली नाही. तसेच महामारीमुळे कुटुंबांची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यानेही मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा मधुमेहाने होणारे मृत्यू सरासरीच्या तुलनेत १५ टक्के जास्त होते. अल्झायमरने १२% जास्त मृत्यू झाले. व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठात सोसायटी अँड हेल्थचे संचालक अॅमिरेट्स स्टीव्हन वूल्फ यांनी सांगितले की, औषधांवर खर्च करायचा की खाण्यावर वा डोक्यावरील छत टिकवून ठेवायचे यापैकी एकाची निवड करण्यास अनेक जण बाध्य होते. अनेक जण महामारीत स्वत:ला वाचवतील. मात्र महामारीमुळे त्यांच्या आरोग्य आणि उत्पन्नावर जो परिणाम झाला त्यामुळे भविष्यातही त्यांना त्रास होत राहील व त्यांच्या मृत्यूचेही कारण ठरेल, असा इशाराही दिला आहे.
व्हाइट हाऊस कर्मचाऱ्यांचे आधी होणार नाही लसीकरण
सुरुवातीला वृत्त होते की, ट्रम्प प्रशासनातील लोकांना फायझर- बायोअॅनटेकची लस आधी दिली जाईल. मात्र, स्वत: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही योजना बदलली आहे. त्यांनी लिहिले आहे की, व्हाइट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना नंतर लस दिली जाईल. ज्यांना जास्त गरज आहे त्यांना आता ही लस द्यायला हवी. पहिल्या टप्प्यातील लसीकरणात आता सुमारे ३० लाख डोस अमेरिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचारी आणि जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य दिले जाईल.
कोरोना : ४१ देशांतील रोजचे मृत्यू आले शून्यावर, भारतात तीन आठवड्यांपासून सतत घटतेय संख्या
जगभरात कोरोनाची लस देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, दिलासा देणारे वृत्त असे आहे की, जगभरात कोरोनाने रोज होणाऱ्या मृत्यूंचे आकडेही घटत आहेत. सध्याच्या स्थितीत १९३ देशांपैकी ४१ देश असे आहेत, जेथे कोरोनाने रोज होणारे मृत्यू थांबले आहेत. म्हणजे आता एकही मृत्यू होत नाही. भारतातही यात सुधारणा दिसत असून सलग तीन आठवड्यांपासून यात घट नोंदवण्यात आली आहे. कोरोनाचे जगभरात आतापर्यंत ७ कोटींपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यातील १६ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. मात्र, ५ कोटींपेक्षा जास्त रुग्ण बरेही झाले आहेत.
प्रत्येक दहा लाख लोकांमागे बेल्जियममध्ये सर्वाधिक मृत्यू, भारत ७५ व्या क्रमांकावर : लोकसंख्येच्या दृष्टीने तुलना केल्यास प्रत्येक दहा लाख लोकांमागे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक बेल्जियममध्ये आहेत. १४ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार बेल्जियममध्ये दहा लाखांमागे मृत्यूंचा आकडा १५६३ आहे. इटली व स्पेनदेखील अव्वल ५ देशांमध्ये सामील आहेत.
कोणत्या आजाराने किती मृत्यू वाढले
आजार वाढ
मधुमेह 15%
अल्झायमर 12%
उच्च रक्तदाब 11%
न्यूमोनिया 11%
हृदयविकार 6%
स्ट्रोक 5%
सेपसिस 4%
नोट ः ही आकडेवारी १५ मार्च ते १४ नोव्हेंबरपर्यंतची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.