आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामधुमेही रुग्णांना मिठाई खाण्यास मनाई असते. मात्र हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात तयार होत असलेली बर्फी मधुमेहीसुद्धा खाऊ शकतील. ती त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. सोलनच्या नौणीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या संमेलनात ही बर्फी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ही बर्फी हमीरपूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिकांचा अाविष्कार होय. तिची गुणवत्ता पूर्णपणे तपासण्यात आली आहे.
कृषी जाणकार डॉ. सुरेंद्र बन्सल यांनी सांगितले की, हमीरपूर कृषी विज्ञान केंद्राने पपई, भोपळा आणि दुधीपासून बर्फी बनवण्याचे प्रशिक्षण बचत गटाच्या महिलांना दिले. आता २०० महिला हे काम करत आहेत. या महिलांना कृषी विज्ञान केंद्राने (केवीके) तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून दिले आहे. मिठाई बनवण्याचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात आणखी महिलाही सहभागी होत आहेत. हमीरपूर कृषी विज्ञान केंद्राचे जाणकार डॉ. चमन यांनी सांगितले की, बर्फीसह इतर मिठाई बनवण्याचे काम हमीरपूर जिल्ह्याच्या ५ गावांतील महिला करत आहेत. त्यात बडाह, रैहल, लड, सपराला आणि बाहलचा समावेश आहे. वेगवेगळ्या बचत गटाशी निगडित महिलांनी गतवर्षी ७०० क्विंटल बर्फी विकली होती.
तेल-तुपाशिवाय बनते ही शुगर फ्री बर्फी
डॉ. बन्सल यांनी सांगितले की, ही शुगर फ्री बर्फी आहे. त्यामुळे मधुमेही रुग्ण ती बिनदिक्कत खाऊ शकतात. ही बर्फी तेल-तुपाशिवाय बनते. दुधी भोपळ्यात अौषधी गुण आहेत. त्याचा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना फायदा होतो. दुधीमुळे वजनही कमी होते. यामुळे महिलांना रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. बाजारात ही बर्फी २०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जाते. सध्या ती हमीरपूरच्या परिसरात प्रसिद्ध आहे. ती संपूर्ण हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांतही पाठवण्याची तयारी सध्या सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.