आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Diagnoses Neuron Infection; Through The Highway, The Message Is Conveyed To The Brain, It Determines Our Behavior

रिसर्च:न्यूरॉन्स संसर्गाचे निदान करते; महामार्गाद्वारे मेंदूला संदेश पोहोचवला जातो, यातून ठरते आपले वर्तन

लंडन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्फ्लुएंझा ताप बळकटहून बळकट लोकांनाही अंथरून धरायला भाग पाडतो. यात भूकही लागत नाही. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळले की, गळ्यातील मज्जापेशी फ्ल्यू विषाणूच्या संसर्गाचा संदेश मेंदूपर्यंत देतात. यानंतर मेंदू व्यक्तीला विश्रांती घेण्याचा निर्देश देतो. त्याची भूक, तहान कमी होते. नेचर मासिकात प्रकाशित या संशोधनानुसार, शरीरात जिथे कुठे संसर्ग झाला असेल त्या ठिकाणचे न्यूरॉन्स मेंदूला संदेश पोहोचवतात. त्यानुसार मेंदू वर्तन निश्चित करतो. अभ्यासाशी संबंधित हार्वर्ड मेडिकल स्कूलचे न्यूरोसायंटिस्ट स्टीफन लिबलेन्स यांच्या म्हणण्यानुसार, शरीरात संसर्ग आहे याची माहिती मेंदूपर्यंत कशी पोहोचते हे याआधी स्पष्ट नव्हते. संसर्ग झालेल्या अवयवातील संदेशवाहक कण, रक्ताच्या माध्यमातून मेंदूपर्यंत संदेश देत असतील,अशी याआधी मान्यता होती. या संदेशवाहक कणात प्रोस्टाग्लॅडिन्समध्ये नावाचे सिग्लन केमिकल होते. अॅस्प्रिन आणि आयब्रूफेन याची निर्मिती रोखतात आणि आजाराच्या वर्तनास दाबतात, ज्याद्वारे हा संकेत मिळत होता की, प्रोस्टाग्लॅडिन्स अशा प्रकारचे वर्तन निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. मात्र, संशोधकाला आढळले की, एका प्रोस्टाग्लँडिन्स रिसेप्टर ईपी३ आजारपणाचे वर्तन उत्पन्न करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. मेंदूसह संपूर्ण शरीरात न्यूरॉन्सवर ईपी३ आढळला आहे. हेच न्यूरॉन्स कोणत्या भागात संसर्ग झाला याची अचूक माहिती देतात.

वेगवेगळ्या संसर्गासाठी न्यूरॉन्सचे डेडिकेटेड मार्ग अभ्यासानुसार, न्ूरॉन्सचे वेगवेगळे डेडिकेटेड मार्ग असू शकतात ज्याद्वारे ते मेंदूपर्यंत संसर्गाचा अलर्ट घेऊन जातात. पोटात संसर्ग झाल्याची माहिती देतात,ज्यामुळे मळमळ हाेण्याची प्रतिक्रिया निर्माण करतात.

बातम्या आणखी आहेत...