आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

माजी कोरियन अधिकाऱ्याचा दावा:उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन कोमात, बहिणीच्या हाती देशाची सत्ता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किम जोंग उन कोमात असल्याचा दावा दक्षिण कोरियाचा माजी अधिकारी चांग सोंग मिनने केला आहे

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन कोमात असून, सध्या देशाची सत्ता किमची बहिण किम यो जोंग सांभाळत असल्याचा दावा दक्षिण कोरियाचे माजी इंटेलिजेंस ऑफिसर चांग सोंग मिनने केला आहे. मिनने देशाचे माजी राष्ट्रपती किम देई जुंग यांचे स्पेशल असिस्टेंट म्हणून काम केले आहे. मिनने सांगितल्यानुसार, किम जोंग उनची प्रकृती गंभीर असून, त्यांच्या आजाराबाबत अद्यात स्पष्टपणे कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

एका महीन्यापूर्वी किम गंभीर आजारी असल्याची माहिती समोर आली होती. पण, तेव्हा किम अचानक माध्यमांसमोर आल्याने या बातम्यांना पूर्णविराम मिळाला होता.

किम कोमात, पण जिवंत

साउथ कोरियन मीडियाशी बातचीतदरम्यान, मिनने सांगितले की, माझ्या माहितीनुसार सध्या किम कोमात आहेत. पण, अजून जिवंत आहेत. सध्या नॉर्थ कोरियाची सत्ता किमची लहान बहिण किम यो जोंगकडे आहे. जोंगची सत्ता सांभाळण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही मोठ्या भावाला सत्ता सांभाळण्यात जोंगने अनेकवेळा मदत केली आहे.

बहिणीच्या हाती सत्ता का दिली

मिनने म्हटले की, किमने आतापर्यंत जोंगच्या हाती पूर्ण सत्ता दिली नाही. सध्या बहिणीच्या हाती सत्ता देण्याचे कारण म्हणजे, देशावर नेतृत्वाचे संकट ओढवू नये आणि जोंगला सत्तेतील लहान मोठे बारकावे समजता येतील. 33 वर्षीय जोंगबद्दल मागच्या महिन्यात बातमी आली होती की, जोंग सरकारमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. परंतू, किम यांनी अद्याप जोंगला अधिकृतरित्या आपला उत्तराधिकारी घोषित केले नाही.