आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएनचा अहवाल:हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशातील सर्वात मोठी अणुभट्टी केली सुरू; चर्चा करण्याचे यूएनचे आवाहन

उत्तर कोरिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर कोरियाने तीन वर्षांपासून बंद अणुभट्टी पुन्हा सुरू केली

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुन्हा एकदा अण्वस्त्र कार्यक्रमास चालना देणे सुरू केले आहे. अण्वस्त्र असलेला उत्तर कोरिया योंगब्योन प्रकल्पात प्लुटोनियमवर प्रक्रिया करत आहे. त्याचा वापर अण्वस्त्र तयार करण्यासाठी केला जातो. योंगब्योन प्रकल्पात उत्तर कोरियाची सर्वात मोठी ५ मेगावॅटची अणुभट्टी आहे. ही भट्टी डिसेंबर २०१८ पासून बंद आहे. संयुक्त राष्ट्राच्या आण्विक संस्थेने वार्षिक अहवालात हा दावा केला आहे. उत्तर कोरियाच्या या निर्णयाबद्दल संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेसोबत दीर्घकाळापासून आण्विक धोरण निष्क्रिय असतानाच उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे वाढवण्याची खुली धमकी दिली आहे.

जगभरातील आण्विक केंद्रांवर लक्ष ठेवणारी इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी (आयएईए) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, हुकूमशहा किम जोंग उन यांच्या नेतृत्वात उत्तर कोरियाचा आण्विक व बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगाने वाढला आहे. यामुळे या देशावर अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रतिबंध लागले आहेत. यूएनच्या संस्थेने म्हटले आहे की, जुलैच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियातून संकेत येत होते. तेथून मोठ्या प्रमाणात थंड पाणी सोडले जात होते. तसेच नियमितपणे वाहनांची ये-जा दिसून आली. याचाच अर्थ स्पष्ट होता की, भट्टीने काम सुरू केले आहे.

२००९ पासून उत्तर कोरियावर यूएनकडून देखरेख
जगभरातील आण्विक केंद्रांवर लक्ष ठेवणारी इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी संस्थेला उत्तर कोरियाने २०१९ मध्ये देशातून हाकलले होते. तेव्हापासून आतापर्यंत संस्था बाहेरच्या सूत्रांकडून या ठिकाणांवर लक्ष ठेवते. संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम जोरात आहे.

बातम्या आणखी आहेत...