आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिक्स फोरम:तीन वर्षांत देशाची डिजिटल अर्थव्यवस्था 78 लाख कोटींची होईल : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२५ पर्यंत भारताची डिजिटल अर्थव्यवस्था एक लाख कोटींची (सुमारे ७८ लाख कोटी रुपये) होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या पायाभूत क्षेत्रात १.५ लाख कोटी डॉलरच्या (सुमारे ११७ लाख कोटी रुपये) गुंतवणुकीची संधी आहे. भारतात डिजिटल क्षेत्रातील बदल पाहिल्यास असे जगात कोठेही होत नसल्याचे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर या क्षेत्रात व्यापक पातळीवर सुधारणादेखील केल्या जात आहेत. मोदी म्हणाले, न्यू इंडियामध्ये प्रत्येक क्षेत्रात पायाभूत परिवर्तन होत आहे. देशाची आर्थिक घडी चांगली करण्यासाठी तंत्रज्ञानातून विकास हे साधन ठरेल. सरकार प्रत्येक क्षेत्रातील संशोधनाला महत्त्व देत आहे. तत्पूूर्वी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी युक्रेनवरील हल्ल्यावरून अमेरिका व युरोपने रशियावर घातलेल्या निर्बंधांवर टीका केली. ते म्हणाले, युक्रेन प्रश्नामुळे मानवतेवर संकट ओढवले आहे. या निर्बंधांमुळे जगभरातील लोकांचे नुकसान झाले. गटबाजीमुळे शांतता, स्थैर्य येत नाही. उलट संघर्ष निर्माण होतो, हे इतिहासावरून दिसून येते. उद्योग फोरममध्ये ब्राझील, रशिया, चीन, भारत, दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींमध्ये ब्रिक्स शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली.

बातम्या आणखी आहेत...