आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2022 चा कल:डिजिटल ट्विन्सने अनेक उद्योग, वैद्यकशास्त्रात मोठे बदल; याचा कारभार झाला 23 हजार कोटी रुपये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीतील प्राचीन शहर रोसेनबर्गमध्ये बीएमडब्लूच्या फॅक्टरीचे दोन स्वरूप आहे. एक म्हणजे दरवर्षी हजारो कारचे उत्पादन करणारा वास्तविक प्लांट. दुसरा म्हणजे स्क्रीन किंवा व्हीआर हेडसेटवरून जे दिसते त्याची आभासी थ्रीडी नक्कल. यात प्रत्येक भाग आणि यंत्रसामग्री खरी भासते. वास्तविक कारखान्यात जे काही घडते ते आभासी कारखान्यात त्याच वेळी चालू असते. कारच्या फ्रेम्स रंगवल्या जात आहेत, दरवाजे बसवले जात आहेत आणि कामगारांचे आभासी अवतार मशीनला त्यांच्या पुढच्या स्थानावर घेऊन जात आहेत. हा कारखाना तंत्रज्ञान जगतातील डिजिटल ट्विनचे ​उदाहरण आहे. यात कोणतीही वस्तू वा वातावरणाची हुबेहूब डिजिटल निर्मिती होते. विविध उद्योगांमध्ये डिजिटल ट्विन्स महत्त्वाचे ठरत आहेत. 3-डी मॅपिंग सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओ, छायाचित्रे, ब्लूप्रिंट्स किंवा इतर डेटा फीड करून तयार केलेले डिजिटल ट्विन, वैद्यकशास्त्रात शरीराच्या अंतर्गत भागांचे मॉडेल आणि अभ्यास करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे कार आणि हवाईदलातील लढावू विमानांसहित अन्य विमानांचे प्रोटोटाइप लवकर बनतात. आर्किटेक्टसाठी उत्तुंग इमारती उभारणे, शहरांच्या वसाहतींचे चित्र लवकर स्पष्ट होते.

२०२१ मध्ये डिजिटल ट्विन्सने उत्पादन आणि संशोधनाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. येत्या काही वर्षांत त्यांचा वापर वाढेल. एप्रिलमध्ये, चिपमेकर एनवीडियाने ओमनीवर्स ३-डी सिमुलेशन इंजिन सादर केले आहे. हे उद्योग आणि व्यावसायिक जगाला स्वतःचे डिजिटल ट्विन्स तयार करण्यास सक्षम करेल. अमेजन वेब सर्व्हिसने नोव्हेंबरमध्ये आयओटी टि्वनमेकर सेवा सुरू केली आहे. रिसर्च फर्म रिसर्च अँड मार्केट्सच्या मते, २०२० मध्ये डिजिटल ट्विन मार्केटचा व्यवसाय सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा होता. आता या तंत्रज्ञानाचा सूर्योदय झाला असल्याचे तंत्रज्ञान तज्ज्ञांचे मत आहे. डिजिटल जुळे कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी, जटिल तांत्रिक योजना तयार करण्यासाठी, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

एनवीडियाचे उपाध्यक्ष रिचर्ड कॅरिस म्हणतात की, डिजिटल जुळे आरोग्य सेवा, संगीत, शिक्षण, मुलांना सफारीवर घेऊन जाणे यासह अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहेत. डिजिटल ट्विन्स मिलिमीटरपासून अनेक किलोमीटरपर्यंतच्या वास्तविक वस्तूंची प्रतिकृती बनवू शकतात. पोलंडमधील डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या पथकाने मानवी भ्रूणाच्या हृदयाची नक्कल केली आहे. यामुळे मुलांमध्ये हृदयविकाराचा लवकर शोध घेणे शक्य होईल, असे जेजिलोनियन युनिव्हर्सिटी, क्रॅकोव येथील बालरोगतज्ज्ञ आणि प्रसूतितज्ज्ञ मार्सिन विचेक म्हणतात. वैद्यकीय शास्त्रामध्ये डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जात आहे. शस्त्रक्रिया आणि औषधांमुळे होणारे हृदयाचे नुकसान, कर्करोगाच्या रुग्णांच्या तपासणीत तंत्रज्ञानाचा प्रयत्न केला जात आहे.

ऑटोमोबाइल उद्योगही बदलला आहे. रोझेनबर्ग येथील बीएमडब्ल्यू फॅक्टरीत डिजिटल ट्विन्ससह भागांची चाचणी होते. पिट्सबर्गमधील कार्नेगी मेलॉन इन्स्टिट्यूटमधील डिंग झाओ, सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांची सुरक्षा सुधारण्यासाठी डिजिटल ट्विन्सवर कार उत्पादकांसोबत काम करत आहेत. आयडाहो येथील अणुभट्टी आणि पॅरिसमधील विंड टर्बाइन यांसारख्या गुंतागुंतीच्या आणि धोकादायक यंत्रांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. फ्लोरिडाच्या ६५ चौरस किलोमीटरचे डिजिटल ट्विन बनवण्याचे काम सुरू आहे.

डिजिटल मनुष्याचीही निर्मिती
डिजिटल ट्विन्स मानवही येत आहेत. अमेरिकेची नॅशनल फुटबॉल लीग आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसने डिजिटल अॅथलिट तयार केला आहे. फुटबॉल सामन्यात दुखापतींवर उपचार आणि समजून घेण्यासाठी तो डिजिटल स्वरूपात खेळाडूंसोबत धावेल.

बातम्या आणखी आहेत...