आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावर:दिलीपकुमार यांच्या घराची पाकमध्ये पावसाने पडझड, दाेन्ही हवेल्या राष्ट्रीय वारसा घाेषित

पेशावर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील मुसळधार पावसामुळे शाे-मॅन राज कपूर व दिलीपकुमार यांच्या वडिलाेपार्जित घरांची हानी झाली आहे. या हवेल्या किस्सा ख्वानी बाजारपेठ भागात आहेत.

या दाेन्ही हवेल्या आधीच जर्जर स्थितीत असल्याचे स्थानिक लाेकांचे म्हणणे आहे. मुसळधार पावसात त्यांच्या या घराची काही ठिकाणी पडझड झाली. दाेन्ही हवेल्या पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून पूर्वीच जाहीर केले आहे. त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु आतापर्यंत खैबर पख्तुनख्वाच्या पुरातत्व विभागाने पुनर्बांधणीचे काम सुरू केलेले नाही.

दिलीपकुमार यांचे याच महिन्यात निधन: दिलीपकुमार यांचे याच महिन्यात सात जुलै राेजी मुंबईत दीर्घ आजारानंतर वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. राज कपूर यांचे अस्थमाशी संबंधित गुंतागुंतीमुळे वयाच्या ६३ व्या १९८८ मध्ये निधन झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...