आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोपेच्या खाेलीत सौम्य प्रकाशामुळेही झोपमोड होऊ शकते. त्यामुळे अपुऱ्या झोपेची समस्या नेहमी जाणवू लागते. त्यातून वयस्करांमध्ये आराेग्यविषयक गंभीर समस्यांना सुरुवात होते. शिकागोमध्ये अलीकडेच झालेल्या संशाेधनात खाेलीतील सौम्य प्रकाशाचाही वयस्कराच्या आराेग्यावर परिणाम होताे. पुरुष व महिलांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबाचा धाेका वाढताे. संशाेधकांनी ६३ ते ८४ वयाेगटातील ५५२ पुरुष व महिलांना एक अॅक्टिग्राफ (झोपेला सेन्सर करणारा हा बँड आहे) दिला. त्यानंतर झोप व दिनचर्याची तुलना करण्यात आली. शिकागोमध्ये नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठातील फीनबर्ग स्कूल आॅफ मेडिसिन प्राे. फिलिस जी म्हणाले, अनिद्रेचा त्रास जाणवल्यास झोपेच्या खाेलीतील प्रकाश बंद करावा.
वास्तविक झोपेच्या वेळी व्यक्तीने कोणत्याही प्रकाशापासून दूर राहिले पाहिजे. फिलिस व त्यांच्या टीमने निराेगी वयस्करांसाठी २० वर्षीय व्यक्तीच्या झोपेत प्रकाशाचा परिणाम याचाही अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासात वयस्करांना सौम्य प्रकाशात झोपण्याचा सल्ला दिला आहे. सौम्य प्रकाश डाेळ्यावर पडताच सहभागी तरुणांची झोपमोड झाली. त्यात तरुण पुन्हा झोपले. परंतु पूर्ण झोप होऊ शकली नाही, अशी तक्रार त्यांनी केली. म्हणूनच संशाेधनानुसार अंधारात लोक पाच तासांहून कमी वेळ झोपतात हे लक्षात आले. खाेलीत ५३ टक्क्यांहून जास्त प्रकाश ठेवणाऱ्यांत मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्याही निर्माण होऊ शकते.
झोपेच्या खाेलीत मोबाइल चार्ज करणे टाळावे
प्रत्येक प्रकारच्या जाेखमीपासून बचाव करण्यासाठी झोपेच्या खाेलीत मोबाइल, लॅपटाॅप चार्जिंग करू नये. बदलणाऱ्या निळ्या प्रकाशात मेलाटाेनिन तुमची झोपमोड करू शकते. डाेळ्यांना झाकण्यासाठी नाइट स्पीप बँड डाेळ्यात लावलेले याेग्य होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.