आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Direct Conflict Between The Shahbaz Government And The Judiciary; Dharna From Today Against The Chief Justice Who Freed Imran

पाकिस्तान:शाहबाज सरकार विरूद्ध न्यायपालिका; इम्रान यांची सुटका करणाऱ्या मुख्य न्यायमूर्तींविरोधात आजपासून धरणे

इस्लामाबाद | रझा हमदानी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानमध्ये तिहेरी संकट, लढाई सरकार-लष्कर विरुद्ध इम्रान-न्यायपालिका

पाकिस्तानमध्ये राजकीय, आर्थिक आणि सुरक्षेचे संकट आहे. राजकीय आघाडीवर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली लष्कर सरकारसोबत आहेत. नवाज शरीफ यांच्याप्रमाणे इम्रान यांनी सत्तेत परतण्यासाठी लष्करासोबत नाते सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी थेट टक्कर दिली. यासेाबत ते सरकारला आव्हान देत आहेत. एकीकडे सरकार ,लष्कर तर दुसरीकडे इम्रान व न्यायपालिका असे चित्र आहे.

राजकीय संकट, दहशतवादाच्या दुहेरी संकटात अडकले पाक लष्कर

सैतान गडद निळ्या रंगाच्या समुद्रात अडकतो,अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे पाकिस्तान लष्कर राजकीय अस्थिरता आणि दहशतवादात अडकले आहे. एकीकडे, राजकीय प्रकरणांत हस्तक्षेपासाठी लष्करावर शाब्दीक हल्ले होत आहेत. अशी टीका कधी झाली नव्हती. अतिरेक्यंानी पोलिस आणि सुरक्षा दल, म्हणजे लष्करावर हल्ले वाढवले आहेत.

२६ वर्षांनंतर अशी स्थिती | पाकिस्तानमध्ये सर्वोच्च न्यायालयाविरोधात धरण्याची स्थिती २६ वर्षांनंतर तयार होत आहे. नेाव्हेंबर १९९७ मध्ये पीएमएल-एन नेते आणि कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टावर शेवटचा हल्ला केला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरुद्ध एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्या वेळी मुख्य न्यायमूर्ती सज्जाद अली शाह आणि राष्ट्रपती फारूक खान लेघारी यांच्याशी वाद सुरू होता. जमावाच्या हल्ल्यामुळे न्यायमूर्तींना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले होते. भीती-धमकाण्याच्या वातावरणात न्यायालयात प्रकरण समाप्त झाले आणि शेवटी मुख्य न्यायमूर्ती आणि राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला.

पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा दिल्यानंतर सरकार आर-पारच्या मूडमध्ये दिसत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी पाकिस्तान डेमॉक्रॅटिक मूव्हमेंट(पीडीएम) सर्वोच्च न्यायालयालयाजवळ धरणे देणार आहे. पीडीएम प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी घोषणा केली की, न्यायपालिकेकडून इम्रान यांची “बाजू’ घेण्याविरोधात आघाडीतील पक्ष सोमवारपासून धरणे आंदोलन करतील. पाकिस्तानचे मुख्य न्यायमूर्ती उमर अता बांदियाल राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. आघाडीतील सहकारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या(पीएमएल-एन) वरिष्ठ उपाध्यक्ष मरियम नवाज इस्लामाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे, रावळपिंडीमध्ये लष्करी मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लष्कर समर्थक बॅनर लावत आहेत. धरणे पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या(ईसीपी) याचिकेवर सोमवारी होणाऱ्या सुनावणीसोबत होईल. निवडणूक घेण्याच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी आयोगाने या याचिकेत केली आहे. १४ मे रोजी पंजाब विधानसभेची निवडणू घेतली जावी,असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीची तारीख निघून गेल्यावर आयोगाने याचिका दाखल केली आहे. यादरम्यान, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे(पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुत्तो-झरदारी यांनी न्यायपालिकेवर निशाणा साधला आहे.