आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटिश सरकारने शुक्रवारी कोविड-१९ चा मागोवा घेणारे त्यांचे अनेक कार्यक्रम बंद केले किंवा कमी केले. यामुळे अमेरिका आणि इतर देशांनी विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेला धोका समजून घेण्यासाठी वापरलेल्या डेटाचे संकलन कमी होईल. डेन्मार्क, इस्रायलनेदेखील विषाणूचा मागोवा घेण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. या स्थितीवर आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, कमकुवत मॉनिटरिंग सिस्टिममुळे नवीन लाटांचा अंदाज घेणे आणि भविष्यातील व्हेरिएंट शोधणे कठीण होईल.
रॉकफेलर फाउंडेशन एपिडेमिक प्रिव्हेन्शन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सॅम्युअल स्कार्पिनो म्हणतात की, कोविडच्या बाबतीत आता अडचणी वाढतील. २०२० मध्ये अल्फा व्हेरिएंट आढळल्यानंतर अमेरिकेत पसरण्यापूर्वी ब्रिटनने त्याच्या डेल्टा, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेतला. मार्च २०२० मध्ये ब्रिटिश संशोधकांनी हजारो लोकांची चाचणी करून नवीन प्रकार शोधले. २०२० च्या अखेरीस ब्रिटनने हजारो विषाणू नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करून अर्ध्याहून अधिक कोरोना व्हायरस जीनोम्स डेटा तयार केला होता. ब्रिटनने या विषाणूची माहिती संपूर्ण जगाला दिली आहे.
डेन्मार्क आणि इस्रायलनेही विषाणूच्या चाचण्यांद्वारे त्यात होणारे बदल शोधले. इस्रायलने लसीकरणानंतर विषाणूचा मागोवा घेताना सांगितले की, लसींची परिणामकारकता कमी होत आहे. यानंतर इतर देशांनी लसीचे बूस्टर डोस लागू करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनने व्हेरिएंटबद्दल सर्वाधिक माहिती गोळा केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ब्रिटनच्या मागोवा घेण्याच्या यंत्रणेने जगाला ओमायक्राॅनच्या बीए.२ व्हेरिएंटबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. © The New York Times
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.