आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकास, मानवी हक्क आणि स्पर्धात्मकतेत आघाडीवर असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेचे आणखी एक चित्र समाेर येत आहे. अमेरिकन समाजात वांशिक भेदभाव कायम आहे. विज्ञानाच्या जगात, हे आणखी स्पष्ट हाेत आहे. भेदभावाची स्थिती अशी आहे की पुरस्कारांच्या यादीवर फक्त गोरे अमेरिकनच वर्चस्व गाजवतात, प्रतिभावंत आशियाई वैज्ञानिक त्यापासून वंचित आहेत. एवढेच नाही तर आशियाई शास्त्रज्ञांना संशोधनासाठी निधी मिळण्यात अडथळे येत आहेत. त्यांना निधी मिळणे खूप अवघड आहे, तर गोऱ्या वैज्ञानिकांसाठी ते सोपे आहे. आशियाई संशोधकांमध्ये भारतीय आणि चिनी वंशाच्या लोकांची संख्या जास्त आहे.
इलाइफ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये आशियाई-अमेरिकन शास्त्रज्ञांबाबत भेदभाव वाढला आहे. त्यांचे २०% पेक्षा जास्त संशोधन प्रस्ताव नाकारले गेले आहेत. अमेरिकेत नॅशनल सायन्स फाउंडेशनतर्फे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, भूविज्ञान, गणित आणि भौतिकशास्त्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी निधी देते. इथे गाैरवर्णीयांपाठाेपाठ लॅटिन आणि कृष्णवर्णीयांनंतर आशियाई शास्त्रज्ञांना स्थान मिळते. आशियाई शास्त्रज्ञ या रांगेत शेवटचे आहेत. कॅलिफोर्नियातील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीतील भूवैज्ञानिक क्रिस्टीन यिफेंग चेन म्हणतात की, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात आशियाई-अमेरिकन लोकांचे वर्चस्व आहे असे सामान्यतः मानले जाते. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात फारशा अडचणी येत नाहीत, पण हे वास्तव नाही. नॅशनल सायन्स फाउंडेशनने आपल्या अहवालात कुणाला किती निधी दिला याचा उल्लेखही केलेला नाही. यामुळे, विज्ञानाच्या जगात आशियाई-अमेरिकन लोकांबाबत हाेणाऱ्या भेदभावाची माहिती सर्वसामान्यांना नाही. अमेरिकेतील अनेक विद्यापीठे आणि संस्थाही असा भेदभाव हाेत असल्याचे मान्य करतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक युह नूंग जैन यांचा संशोधन अहवाल ‘सेल’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. ते म्हणतात, जैववैद्यक क्षेत्रामध्ये आशियाई शास्त्रज्ञ २०% आहेत, परंतु आशियाई-अमेरिकन शास्त्रज्ञांपैकी फक्त ७% लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रोफेसर आराधना त्रिपाठी म्हणतात की, नवीन नियुक्त्यांमध्ये गाैरवर्णियांपेक्षा आशियाई लोकांची संख्या जास्त असल्याचे सांगितले जात आहे, परंतु हे सत्य नाही.
संशोधनाचा स्तर खालावला, इतर संशोधनांत त्याचा उल्लेखही नाही
संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध अहवालानुसार, वैज्ञानिक संशोधनाची पातळी सातत्याने घसरत आहे. गेल्या १० वर्षांत हा स्तर इतका घसरला आहे की, एकाच विषयाशी संबंधित संशोधनात पाच वर्षांपासून अशा संशोधनाचा संदर्भही दिला जात नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.