आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Disinfo Laba Report Updates: In The Pockets Of 158 Crore Militants Gathered In The US To Help India !; Covid 19 Scam Revealed In 2021; News And Live Updates

ड‍िसइन्फो लॅबचा अहवाल:अमेरिकेत भारताच्या मदतीसाठी जमवलेले 158 कोटी अतिरेक्यांच्या खिशात!; कोविड-19 स्कॅम 2021मध्ये खुलासा

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्गणी गोळा करण्याच्या 65 मोहिमा बनावट असल्याचे स्पष्ट, अमेरिकेत पाकिस्तानच्या 23 स्वयंसेवी संस्थांचे मोठे कारस्थान

अमेरिकेत सुमारे २३ पाकिस्तानी स्वयंसेवी संघटनांचे (एनजीओ) मोठे कारस्थान उघडकीस आले आहे. युराेपात दुष्प्रचार मोहिमेवर लक्ष ठेवणारी संस्था ‘डिसइन्फो लॅब’ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात म्हटले आहे की, अमेरिकेत पाकिस्तानी एनजीओंनी दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान भारताच्या कथित मदतीसाठी अभियान चालवले. भारतातील ऑक्सिजन संकट बघता या अभियानांना ‘हेल्प इंडिया ब्रीद’ नाव देण्यात आले. याद्वारे सुमारे १५८ कोटी रुपये जमवण्यात आले. मात्र ही रक्कम बहुतांश अतिरेक्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. ‘डिसइन्फो लॅब’च्या अहवालाचे नाव ‘कोविड-१९ स्कॅम २०२१’ आहे. यात मदतीच्या नावाने राबवण्यात आलेले ६५ बनावट अभियान उघड केले आहेत.

अहवालात म्हटले आहे की, हा मानवी इतिहासातील सर्वात वाईट घोटाळ्यांपैकी एक आहे. हे अभियान राबवणाऱ्यांपैकी एक संघटना ‘इमाना-इस्लामिक मेडिकल असोसिएशन’ अमेरिकेत इलिनोइसमध्ये कार्यरत आहे. तिची स्थापना १९६७ मध्ये करण्यात आली. डॉ. इस्माईल मेहर इमानाचे अध्यक्ष आहेत. मुख्यत्वे त्यांनीच ‘हेल्प इंडिया ब्रीद’ची योजना आखली होती. अहवालात म्हटले आहे की, ‘हेल्प इंडिया ब्रीद’ सोशल मीडियावर २७ एप्रिल २०२१ रोजी सुरू करण्यात आले. सुमारे १.८ कोटी लोकांकडून देणग्या गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. विशेष म्हणजे भारतात इमानाचे कार्यालयही नाही. म्हणून वर्गणी गोळा करण्यापासून तिला रोखता आले नाही. अभियानादरम्यान इमाना दर तासाला सुमारे ७३ लाख रुपये जमवत होते.

इमाना व आयसीएनएचा अनेक अतिरेकी संघटनांशी संबंध, हमासलाही करतात मदत
अहवालानुसार अमेरिकेत भारताच्या मदतीच्या नावाने वर्गणी जमवणाऱ्या अनेक पाक संघटना कार्यरत आहेत. त्यातीलच इमाना व इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका (आयसीएनए) यांचे संबंध जगातील अनेक अतिरेकी संघटनांशी आहेत. आयसीएनए पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासलाही निधी उपलब्ध करते. इमाना व आयसीएनए चालवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त कर्मचारी मदत करतात. पाकिस्तानी लष्कर त्यांना प्रोत्साहन देते.

५.६० कोटींची वैद्यकीय उपकरणे घेतल्याचा दावा, मात्र संघटना पुरावेही देऊ शकत नाहीत
इमानाचे अध्यक्ष डॉ. इस्माईल मेहर यांनी अनेक शंकास्पद दावे केले आहेत. त्यांनी सांगितले, इमानाने ५.६० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे विकत घेतली. मात्र ही उपकरणे भारतात आलीच नाहीत. मेहर यांनी दावा केला की, त्यांनी मदत साहित्य पोहोचवण्यासाठी एअर इंडियासोबत करार केला आहे. मात्र पुरावा देऊ शकले नाहीत. तसेच इतर संघटनाही त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे देऊ शकल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...