आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Dispel Taliban Terror In 10 State Capitals In Six Days; Lotangan Continues Without Fighting Afghan Forces; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:10 राज्यांच्या राजधान्यांना तालिबानी दहशतीचा सहा दिवसांत विळखा; अफगाणी सैन्याचे न लढताच लोटांगण सुरू

काबुल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुप्त करार मोडल्याने अमेरिकेचे तालिबानी अड्ड्यांवर हल्ले

अफगाणिस्तानात तालिबानी दहशतीचा विळखा वाढत चाललाय. केवळ सहा दिवसांत ३४ राजधान्यांपैकी १० वर आता तालिबानचे वर्चस्व आहे. तालिबानच्या दहशतीपुढे अफगाणी सुरक्षा दलाचाही थरकाप उडाला. म्हणूनच सुरक्षा दल शस्त्र सोडून तालिबानसमोर सपशेल शरणागती पत्करू लागले आहेत. गझनी प्रांताच्या पाेलिस मुख्यालयातील सूत्रानुसार गझनीचे गव्हर्नर दाऊद लगमनी व पोलिस कमांडर फजल अहमद सिराजद यांनी तालिबानशी करार केला आहे. त्यामुळेच तालिबानचे दहशतवादी राज्यात सहजपणे घुसखोरी करू लागले आहेत. आता गझनीवर तालिबानचे वर्चस्व आहे. पोलिस कमांडर, गव्हर्नरला तालिबानी दहशतवादी आपल्या सुरक्षेत काबूल-गझनी महामार्गाने काबूलला नेत होते. याच मार्गावर अफगाणिस्तानच्या नॅशनल डिफेन्स सेक्युरिटी फोर्सने वारदक प्रांतात त्यांना अटक केली. स्थानिक लोक व राजकीय नेत्यांमध्ये केंद्र सरकारबद्दलचा संताप वाढत चालला आहे.

संसदेत उत्तर अफगाणिस्तानातील खासदार म्हणाले, सुरक्षा दल न लढताच शहरातून निघून गेले. समांगनचे खासदार अब्दुल्ला माेहंमदी म्हणाले, लढाई न करताच मागे हटणे दुर्दैवी आहे. तालिबानने पोलिस मुख्यालय व राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या इमारतीवरदेखील ताबा मिळवला. तखरचे रहिवासी फरमार्ज अमिरी म्हणाले, तखर ४० दिवसांपासून युद्धात होरपळत आहे. अनेक चकमकी उडाल्या. या भागातील बहुतांश लोकांनी इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे. अन्य रहिवासी रमजान म्हणाले, केंद्र सरकारच्या पाठिंब्याविना सुरक्षा दल व बंडखोर यांच्यात ४० दिवसांपासून लढाई सुरू आहे. शस्त्रास्त्रांची कमतरता व सरकारच्या मदतीअभावी तालोकान हातून गेला. आता तालिबानने तेथे वर्चस्व मिळवले आहे. उत्तर अफगाणिस्तानातील स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी मार्शल दोस्तमने आपल्या राखीव दलासह काबूलहून मजार-ए-शरीफच्या दिशेने कूच केले होते. त्याच वेळी मजार-ए-शरीफमध्ये राष्ट्रपती अशरफ घनी यांनी लष्कर व राजकीय नेते यांची बैठक बोलावली होती. तालिबानने तख्हर, कुंदुज, बादाखन प्रांतावर वर्चस्व मिळवले आहे.

शेर्बगानच्या दिशेने चाल करून जाणाऱ्या तालिबानला रोखण्यासाठी यातिमपर्यंत मार्शल दोस्तमचा मुलगा यार मोहंमद दोस्तमच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू आहे. पश्चिम अफगाणिस्तानातील हेराट प्रांतात बंडखोर नेता इस्माईल मोहंमद तालिबानशी टक्कर घेत आहे. या गटाला पुरेशा प्रमाणात दारूगोळा आणि सरकारची मदत मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. संघर्षाच्या या परिस्थितीत घरेदारे सोडून निर्वासित जगणाऱ्या सामान्य लोकांवर उपासमारीच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. आयडीपी छावणीत दूध मिळत नसल्याने दोन नवजात बालकांना प्राण गमवावे लागले. मानवी हक्क संघटनेतील लोक मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.

गुप्त करार मोडल्याने अमेरिकेचे तालिबानी अड्ड्यांवर हल्ले
अमेरिका व तालिबान यांच्यात एक गुप्त करार झाला होता, असा दावा काबूल येथील पत्रकार इस्माईल अँडलिप यांनी केला आहे. त्यानुसार अमेरिकी सैन्य परत येत नाही तोवर तालिबान मोठ्या शहरांचा ताबा घेणार नाही. परंतु दहशतवाद्यांनी आधीच मोठ्या शहरांवर हल्ला केला. त्यावरून दोन्ही पक्षांनी परस्परांचे म्हणणे ऐकले नसावे असे वाटते. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी बी-५२ लढाऊ विमानांनी तालिबानच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्याचे इस्माईल सांगतात. कदाचित तालिबानने कराराचे उल्लंघन केले असावे म्हणूनच अमेरिकेने ही कारवाई केली असावी.

बातम्या आणखी आहेत...