आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे घटस्फोट घेण्याचे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेत ७०-९० टक्के घटस्फोटांची प्रकरणे महिलांनी दाखल केली आहेत. ब्रिटनमध्ये घटस्फोटासाठी ६२ टक्के प्रकरणांत महिला याचिकाकर्ता आहेत. पश्चिमेकडील देशात घटस्फोटाची प्रक्रिया अतिशय सो पी आहे. हेदेखील पश्चिमेकडील देशांत घटस्फोट वाढीमागील कारण मानले जाते. डॉ. हँडी कार म्हणाले, महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य, समज वाढल्याने वैवाहिक संघर्षात वाढ होते. महिलेकडे रोजगार असल्यास आर्थिक पातळीवर अपमानकारक परिस्थितीत राहणे त्यांना आवश्यक वाटत नाही. त्यामुळेही महिलांकडून घटस्फोटासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे मानले जाते.घटस्फोट घेतल्यानंतर ३९ टक्के पुरुषांना पश्चात्ताप होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घटस्फोटानंतर खेद वाटणाऱ्या महिलांचे प्रमाण २७ टक्के आहे. कोणत्याही महिलेसाठी दु:खी वैवाहिक जीवनाच्या तुलनेत घटस्फोटित जीवन कधीही समाधान देणारे ठरते.
भारतात घटस्फोटित महिलांचे प्रमाण ०.३ टक्के
राष्ट्रीय कुटुंब-आरोग्य पाहणीनुसार भारतात केवळ ०.३ टक्के महिला घटस्फोटित आहेत. त्यामागे महिलांना स्वातंत्र्य नसणे, कुटुंबाचे सहकार्य नसणे व देशात घटस्फोटाबद्दलचा दृष्टिकोन इत्यादी कारणे असल्याचे तज्ञांना वाटते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.