• Home
  • International
  • Divya Marathi Special : Virus killer mask, hands free handle that will protect you from corona

दिव्य मराठी विशेष : कोरोनापासून वाचवेल व्हायरस किलर मास्क, हँड फ्री हँडल

विषाणू मारणारे मास्क विषाणू मारणारे मास्क
आपत्कालीन व्हेंटिलेटर आपत्कालीन व्हेंटिलेटर
हँडफ्री डोअर आर्म हँडफ्री डोअर आर्म

  • कोरोनाचा सामना करण्यासाठी जगात संशोधन सुरू, हॅकेथॉनद्वारे नव्या कल्पनांवर काम
  • जर्मनीमध्ये 43 हजार लोकांनी घरी बसून पाठवल्या कल्पना

प्रतिनिधी

Mar 26,2020 11:07:00 AM IST

एकीकडे जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर कोरोना विषाणूवर लस आणि महामारी पसरू नये यासाठी मार्ग काढताहेत, तर काही संशोधकांनी त्यापुढेही पाऊल टाकले आहे. नवीन आपत्कालीन व्हेंटिलेटर, विषाणू मारणारा मास्क आणि हँड फ्री ३डी हँडल हे ते नवीन संशोधन आहे, जे केवळ यशस्वी झाले नाही तर त्यांचा वापरही सुरू झाला आहे. दुसरीकडे जर्मनीत हॅकेथाॅनचे आयोजन करण्यात आले. त्यात ८०० पेक्षा जास्त कल्पना प्राप्त झाल्या. तर इकडे भारतात अजूनही शासकीय संस्था लोकांकडून कोरोना पसरू नये म्हणून नवीन कल्पना मागवत आहेत.


३ दिवसांत बनवला व्हेंटिलेटर, थ्री-डी आर्म रोखेल संसर्ग


आपत्कालीन व्हेंटिलेटर : कार्मलथेनच्या ग्लँगव्हिले रुग्णालयाचे डॉ. रायन थाॅमस यांनी इंग्लंडच्या अमानफोर्डची इंजिनिअरिंग कंपनी सीआर क्लार्कसोबत आपत्कालीन व्हेंटिलेटर बनवले आहे. हे व्हेंटिलेटर रुग्णाला शुद्ध हवा देण्याबरोबरच हवेतील घातक कणही नष्ट करते.


विषाणू मारणारे मास्क : व्हायरसटॅटिक शील्ड कंपनीने असा मास्क तयार केला जो हवेतील विषाणू मारण्याचे काम करतो. कंपनीचा दावा आहे की, यामुळे कोरोनासह हवेत असणारे ९५% पर्यंत विषाणू नष्ट होतात. इंग्लंडमधील कोरोनाचे प्रमाण बघून कंपनी त्याचे उत्पादन वाढवणार अाहे.


हँडफ्री डोअर आर्म : या विशेष ३डी प्रिंटेड हँडलचे रचना वायन ग्रिफिथ्स यांनी तयार केली आहे. या प्रोटोटाइप ‘आर्म’चे डिझाइन कोणीही मोफत डाऊनलोड करू शकतो. ग्रिफिथ्स म्हणाले, इंग्लंडमधील लोकांनी वापर करावा. हे आर्म दरवाजाला जोडलेले असते, त्यास हात लावायची गरज नाही.


हॅकेथॉनला ८०० कल्पना : बर्लिनमध्ये चार दिवसांचे हॅकेथॉन आयोजित केले होते. यात ४२ हजार ८६९ जणांनी भाग घेतला, तेही घरबसल्या. कोणत्या प्रकल्पाला शासकीय निधी दिला जाईल याचा निर्णय आता २९ मार्च रोजी ज्युरी घेतील.


भारतात कल्पना मागवल्या : भारतात सरकार आणि दुसऱ्या संस्था कल्पना मागवत आहेत. २७ मार्च रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि ऑल इंडिया काैन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आयडियाथॉन आयोजित करत आहेत.विविध पर्यायांवर काम सुरू झाले आहे.

X
विषाणू मारणारे मास्कविषाणू मारणारे मास्क
आपत्कालीन व्हेंटिलेटरआपत्कालीन व्हेंटिलेटर
हँडफ्री डोअर आर्महँडफ्री डोअर आर्म