आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी 2021:बायडेन सरकारचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी दिवाळीला सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी हा भारताचा सर्वात मोठा सण आहे. हा सण अगदी उत्साहात देशभरात साजरा केला जातो. मिठाई, कपडे, वस्तूंच्या खरेदींसह मोठ्या उत्साहात दिवाळी सण देशभरात साजरा केला जातो. आता अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांना देखील दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा करता येणार आहे. कारण अमेरिका सरकारने भारतीयांनासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

दिवाळीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय अमेरिका सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत देखील अगदी उत्साहाची दिवाळी पाहायला मिळणार हे नक्की. अमेरिका सरकार येत्या बुधवारी एक विशेष विधेयक मांडण्यात आहे.

त्यात दिवाळी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याचा मुद्दा आहे. खासदार कॅरोलिना मॅलोनी हे विधेयक मांडणार असून, या विधेयकाला इंडिया कॉकस, खासदार रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती यांच्यासह इतर नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे जर हे विधेयक पार पडले तर, अमेरिकेतील भारतीयांसह तेथील स्थानिक नागरिकांना देखील हा सण उत्साहात साजरा करण्याची संधी मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...