आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रशिया:महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी काढला 4 फुट लांबीचा साप ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियातील डेगेस्टनमध्ये एका महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी चार फुट लांबीचा साप काढल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर महिला हॉस्पीटलमध्ये गेली होती. तपासणीनंतर महिलेच्या पोटात बाहेरील वस्तु असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले. यानंतर डॉक्टरांनी महिलेला बेशुद्ध करुन तिच्या पोटात एक ट्यूब टाकली आणि सापाला बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांना समजले की, तो साप आहे.

महिलेच्या पोटातून साप बाहेर काढण्याचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टर महिलेच्या पोटातून साप बाहेर काढत असल्याचे दिसत आहे.

साप पोटात कसा गेला

महिलेने सांगितले की, ती आपल्या घराच्या गार्डनमध्ये झोपली होती. यादरम्यान महिलेचे तोंड उघडे राहिले आणि साप पोटात गेला. तोंडावाटे साप महिलेच्या पोटात गेला. सकाळी उठल्यावर महिलेला पोटदुखी सुरू झाली आणि हॉस्पीटल गाठले. त्यानंतर तिला संपूर्ण प्रकार समजला.