आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिद्द:व्हेंटिलेटरवर असताना डाॅक्टर म्हणाले, जिवंत परतणार नाही; आता धाडसाचे हाेतेय काैतुक

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • माजी सैनिकाची १८ दिवसांनंतर काेराेनावर मात
  • पत्नी, मुलगी नव्हती साेबत; रुग्णालयामध्ये एकट्यानेच दिली झुंज

अमेरिकेच्या ५४ वर्षीय माजी मरीन पाेलिस अधिकाऱ्याने माेठ्या धाडसाने १८ दिवसांपर्यंत शर्थीची झुंज देऊन जीवघेण्या काेराेनावर मात केली. त्याची ही झुंज चांगलीच चर्चेत आली आहे. अरकन्सास येथे वास्तव्यास असलेल्या डेव्हिड विलियम्स यांना काेेराेनाची बाधा झाली हाेती. अशात त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना आठ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर हाेऊ लागली. त्यामुळे वैद्यकीय पथकही काहीसे चिंतेत हाेते. यातूनच उपचार करणाऱ्या एका डाॅक्टरने थेट विलियम्स यांना व्हेंटिलेटरवर असताना जिवंत राहण्याची आशा फारच कमी असल्याचे सांगितले हाेते. मात्र, विलियम्स यांनी प्रचंड आत्मविश्वास आणि आपल्या धाडसी बाण्यामुळे काेराेनाच्या आव्हानाला यशस्वीपणे परतवून लावले. त्यानंतर त्यांच्या याच धाडसाचे आता हेच डाॅक्टर काैतुक करत आहेत. ते सर्व जण त्यांना चमत्कारिक रुग्ण म्हणत आहेत.

कुंटुबियसाेबत नसल्याने वाटत हाेती अधिकच चिंता

या महामारीच्या संकटात असताना कुटुंबातील कुणीच साेबत नव्हते. त्यांची भेटच हाेत नव्हती. त्यामुळेच मला माझीच अधिक चिंता वाटत हाेती, असेही विलियम्स म्हणाले. त्यांना २६ मार्च राेजी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...