आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • International
 • Doctors Treating Patients In ICU Suffer From Virus Load At First, But Fear Of Long Covid After Recovery From Infection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनादरम्यान नवीन संकट:आयसीयूत काम करणाऱ्या डॉक्टरांना 'व्हायरस लोड'नंतर 'लॉन्ग कोव्हिड'ची शक्यता

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 14 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या संक्रमणाला 'लॉन्ग कोव्हिड' नाव दिले आहे

हॉस्पीटलमधील आयसीयू ती जागा आहे, जिथे गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला आणले जाते. कोरोना महामारीदरम्यान याचे दृष्य थोडे बदलले आहे. आता आयसीयूमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःलाही संक्रमित होण्यापासून वाचवावे लागत आहे.

आयसीयूत उपचारादरम्यान, रुग्णांकडून पसरलेले कोरोनाचे कण वाढत आहेत. शास्त्रीय भाषेत याला 'व्हायरस लोड' म्हटले आहे. संशोधकांनुसार, आयसीयूत सर्वात जास्त व्हायरस लोड असतो, यानंतर वार्डमध्ये असतो.

ब्रिटेनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियंसमध्ये झालेला शोद सांगतो की, हॉस्पीटलमधील एकतृतीशंपेक्षा जास्त डॉक्टर एकतर आजारी आहेत, किंवा कोव्हिड-19 मुळे क्वारेंटाइन आहेत. आरोग्य जगतातील विश्वसनीय वेबसाइट मेडस्केपनुसार, ब्रिटेनमध्ये कोव्हिड-19 मुळे मरणाऱ्या हेल्थकेअर प्रोफेशनल्सचा आकडा 630 पेक्षा जास्त झाला आहे.

डॉक्टर्स अनेकदा रुग्णांचे सँपल घेतात, त्यांना ऑक्सीजन देतात, चेकअप करतात, यादरम्यान व्हायरसचे कण रुग्णांकडून डृॉक्टर्सकडे पोहचतात. एका रिसर्चनुसार, मेडिकल प्रोफेशनल्स 7 ते 8 तासांची झोपही घेऊ शकत नाहीत. यामुळे हार्ट डिसीज, डायबिटीज आणि स्ट्रोकसह कोरोना संक्रमणाचा धोकाही वाढत आहे. 

लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये संशोधकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवरील व्हायरस लोड कमी करण्यासाठी 7 सल्ले दिले आहेत.

 • संक्रमित वस्तुंना शास्त्रीय पद्धतीने डिस्पोज करावे.
 • पीपीईला घालण्याची आणि काढण्याची ट्रेनिंग दिली जावी.
 • मोबाइल फोनला डिस्पोजेबल प्लास्टिक बॅगमध्ये ठेवले जावे.
 • ट्रांसमिशन थांबवण्यासाठी रुग्णाला जास्त लोकांना भेटू देऊ नका.
 • फॅमिली मेम्बर्स आपला रुग्ण किंवा डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे चर्चा करावी.
 • आयसीयूच्या रुममध्ये हवा खेळती असावी, हवेचे प्रेशर बनता कामा नये.
 • एक वार्डातील टीमने दुसऱ्या वार्डातील टीमसोबत योग्य अंतर ठेवावे.

आयसीयू वार्डमध्ये व्हायरस लोडने त्रस असलेल्या डॉ. जेक यांनी सांगितली आपबीती

1. लॉन्ग कोव्हिडचे पहिले प्रकरण: ड्यूटीच्या एका आठवड्यानंतर दिसले लक्षण

डॉ. जेक स्यूट यांचे वय 31 वर्षे आहे. यांचे काम आयसीयू वार्डात होते. 3 मार्चला यांची ड्यूटी कोरोना कोरोना संक्रमित व्यक्तींना वाचवण्यासाठी लावण्यात आली. 20 मार्चला पहिल्यांदा कोरोनाची लक्षणे दिसली. आता संक्रमण संपल्यानंतरही जेक याच्या साइड इफेक्टने त्रस्त आहेत. आठवड्यातून 4-5 दिवस जिमला जाणाऱ्या जेकला तीन महिन्यानंतरही छातीत त्रास, श्वास घेण्यास त्रास मेमरी लॉस, डोळ्याने कमी दिसत आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, पहिल्या तीन दिवसाल मला असेल वाटले होते की, मी आता जिवंत राहत नाही. माझ्यासाठी हा सर्व विचित्र अनुभव होता. आताही माझ्या हाता-पायांना त्रास होतो. आता परिस्थिती सुधारत आहे, पण खूप मंद गतीने.

2. लॉन्ग कोव्हिडचे दुसरा प्रकरण: संक्रमण संकण्याच्या 9 आठवड्यानंतरही 2 तासांपेक्षा जास्त काम करता येत नाही

लुसी बेलीचे वय 32 वर्षे आहे. पहिल्यांदा कोरोनाचे लक्षण 27 एप्रिलला दिसले होते. पण , आताही त्या घरात दोन तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत. आजाराच्या 9 व्या आठवड्यात आलेल्या लुसीने सांगितले की, तुम्ही कोरोनापासून वाचलात, तरीदेखील तुम्हाला लॉन्ग कोव्हिड होऊ शकतो.

लॉन्ग कोव्हिडचा परिणाम आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांवर पडू शकतो

इम्पीरियल कॉलेज लंडनमध्ये इम्युनोलॉजी विभागाचे प्रोफेसर डैने अल्तमेन सांगतात की, कोरोनाचे अनेक दिवस दिसणाऱ्या साइड इफेक्टवर स्टडी होत आहे. डॉ. जेकलाही यात सामील करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. याला समजणे गरजेचे आहे, कारण डॉक्टरांना रुग्णाला पाहण्यासाठी जावेच लागेल. याचा थेट परिणाम आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांपर पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...