आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थायलंडच्या गुहेतून वाचवलेल्या 12 फुटबॉलपटूंवर माहितीपट, निर्मात्यांनी पाणबुडे-नेव्ही सील्सचीही घेतली मदत

थायलंड/ निकोल स्पर्लिंग18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहितीपट निर्मात्या एलिझाबेथ चाई वासरेली आणि त्यांचे पती जिमी चिन आनंदी तर आहेतच, पण भावुकही आहेत. त्यांचे तीन वर्षांचे परिश्रम यशस्वी होणार आहेत. त्यांचा ‘द रेस्क्यू’ हा माहितीपट ८ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. २०१८ मध्ये थायलंडच्या थाम लुआंग गुहेतून १२ तरुण फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकाला वाचवण्यात आले होते. त्यांना वाचवण्याच्या संघर्षावर चित्रपटाचे कथानक आहे.

माहितीपटात कुठलीही कसर राहू नये आणि तो वास्तवापासून दूर असू नये, अशी वासरेली यांची इच्छा होती. कारण स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय चॅनल्स व माध्यमांनी जेवढी माहिती दिली तेवढीच माहिती लोकांना होती. माहितीपटासाठी वासरेली आणि चिन यांनी तीन वर्षे या घटनेशी संबंधित फुटेज पाहिले. घटनाक्रमाची सुसंगती लागावी, हा त्यांचा उद्देश होता. माहितीपट वास्तवाच्या जवळ असावा यासाठी त्यांनी ब्रिटिश पाणबुड्यांकडून मोहिमेतील दृश्ये रिक्रिएट करण्यासाठी ब्रिटनच्या स्टुडिओत कृत्रिम तलाव तयार केला. माहितीपटाचा मोठा भाग पूर्ण झाला होता, पण घटनेचे गांभीर्य दाखवता यावे यासाठी या मोहिमेशी संबंधित आणखी काही क्षण जिवंत करण्याची वासरेली यांची इच्छा होती. हे महत्त्वाचे क्षण थायलंडच्या नेव्ही सील्सकडे होते. दोन महिन्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही नौदल हे फुटेज त्यांना देण्यास राजी झाले नव्हते.

या वर्षी मे महिन्यात वासरेलींना नौदल कमांडर अर्पाकोर्न युकोंगकाव्ह, त्यांची पत्नी ससिवमोन आणि टीव्ही पत्रकारांशी फुकेतमध्ये भेटीची संधी मिळाली. त्या न्यूयॉर्कला परतल्या तेव्हा त्यांच्याकडे मोहिमेचे ८७ तासांचे मूळ फुटेजही होते. वासरेली म्हणतात की, हे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच होते. पण माहितीपट पूर्ण झाल्यानंतर हे फुटेज मिळाले होते, त्यामुळे माहितीपट बदलण्यात आला. आम्ही तीन वर्षांचे परिश्रम वाया जाऊ देणार नव्हतो. आमच्या या प्रयत्नामुळेच माहितीपटात आता त्याला वेगळ्या उंचीवर नेणारी १५ मिनिटांची दृश्ये आहेत. प्रेक्षक प्रथमच बचाव पथकातील पाणबुडे रिक स्टँटन आणि जॉन वोलांथन यांना थाम लुआंग गुहेबाहेर पडताना पाहू शकतील.

वासरेलींनी थायलंडमध्ये जाऊन घेतली खेळाडूंची भेट, प्रत्येक पैलू समजून घेतला
खेळाडूंच्या हवाल्याने माहितीपट बनवण्याची वासरेली आणि चिन यांची इच्छा होती. पण थायलंड सरकारमुळे त्यांना त्याचे अधिकार मिळाले नाहीत. वासरेलींनी थायलंडला जाऊन खेळाडूंशी चर्चा करून मोहिमेतील प्रत्येक पैलू समजून घेतला. खेळाडूंनीही वासरेलींकडे फुटेज मागितले. मोहिमेत तसेच माहितीपटातही पाणबुड्यांची भूमिका मोठी होती. गुहेत जे घडले ते हुबेहूब दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पाणबुडे स्टँटन म्हणाले की, आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी ओळखले जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग १२ मुलांचे प्राण वाचवण्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते?

बातम्या आणखी आहेत...