आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्वानाच्या सीपीआरमुळे मालक बचावले, क्रूफ्ट्स हीरो अवॉर्ड 2022 साठी डॉग चेवीचे नामांकन

वॉशिंग्टन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयविकाराचा झटका येत असताना मालकाच्या छातीवर सतत उड्या मारून सीपीआर (कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन) देणाऱ्या श्वान चेवीला क्रूफ्टस हीरो अवॉर्ड २०२२ साठी नामांकन देण्यात आले आहे. १३ मार्च रोजी क्रूफ्टस हीरो पुरस्कार सोहळ्यात गौरवले जाऊ शकते. चेवी नावाच्या श्वानाला लिलँड येथील कचराकुंडीत कुणीतरी फेकून दिले होते. तेव्हा त्या भागातून लॉरेटा व रे विटली दांपत्य जात होते. त्यांचे चेवीकडे लक्ष वेधले गेले. या दांपत्याने चेवीला घरी नेले. २०१८ मध्ये लॉरेडा उद्यानात झाडांना पाणी देत होत्या. तेव्हा त्यांना चेवीचा जोरजाेराने भुंकण्याचा आवाज आला. त्या घरात गेल्या आणि त्यांनी पती जमिनीवर पडल्याचे पाहिले. चेवी त्यांच्या छातीवर सतत नाचत असून पतीच्या चेहऱ्याला चाटत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सला फोन केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता चेवी रे यांचा लाडका बनला आहे.

चेवी नसता तर मी पतीला गमावले असते, असे लॉरेटा सांगतात. श्वानाने त्या दिवशी पतीच्या छातीवर उड्या मारल्या नसत्या तर काही घडले असते या विचारांनी अजूनही त्यांच्या मनाचा थरकाप उडतो. परंतु या गोष्टी घडून गेल्या. त्याच्या कृतीमुळे जोडीदाराचे प्राण वाचल्याने त्यांच्यासाठी चेवीबद्दलचा स्नेह आणखी वाढला आहे. चेवीने रे यांना दुसरे जीवन दिले आहे. त्यानंतर लॉरेटा यांनी पाळीव प्राण्यासाठी पाच लाख रुपये दान दिले. पाच वर्षांच्या चेवीचे नामांकन कुणीतरी केनाल क्लब हीरो डॉग अवॉर्डसाठी केले आहे. पुरस्कारासाठी फोन आला तेव्हा कुणीतरी मस्करी करत असल्याचे त्यांना वाटले. परंतु नंतर त्यांना पुरस्काराबद्दल खात्री पटवून देण्यात आली.

श्वान चेवी कुटुंबातील सदस्यासारखा
पतीचे प्राण वाचवणाऱ्या चेवीला लॉरेटा कुटुंबातील सदस्यासारखे मानतात. चेवी नसता तर माझ्यावर एकटे राहण्याची वेळ आली असती. उल्लेखनीय कार्यासाठी अमेरिकेत क्रूफ्टस डॉग अवॉर्ड दिला जातो. यंदा पाच श्वानांना नामांकन मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...