आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या वक्तव्यावरून घूमजाव करणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांनी सोशल मीडिया अॅप ट्रुथ सोशल सुरू केले आहे. हे अॅप मध्यरात्रीच्या आधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. माजी अध्यक्षांचे हे अॅप सोमवारी सकाळी अॅपल स्टोरवर टॉप फ्री अॅपच्या यादीत आघाडीवर होते. वास्तविक युजरला नव्या अॅपमध्येही अनेक प्रकारच्या अडचणींना पार करावे लागत आहे. अनेक युजर्सना तर वेट लिस्टचे संदेश मिळत होते. जास्त मागणीमुळे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संदेश युजर्सना मिळू लागल्याने ते वैतागले होते. परंतु नंतर काही वेळात ही गैरसोय दूर करण्यात आल्याचा दावा अॅप संचालकांनी केला. गेल्या वर्षी ६ जानेवारीला कॅपिटल हिंसाचार उसळला होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर ही घटना घडली होती. ट्रम्प यांच्या समर्थकांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप करण्यात येतो. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावरून बंदी घातली होती.
ट्विटरची कॉपी : ट्रम्प यांचे आयओएस प्लॅटफॉर्मवरील अॅप ट्विटरची कॉपी दिसते. ट्रुथ सोशल आयफोनवर आपोआप डाऊनलोड झाले .प्री-ऑर्डर देणाऱ्यांना हे अॅप उपलब्ध झाले. उर्वरित लोक अॅॅपल स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकतात.
ट्रम्प पुन्हा निवडणूक लढवू इच्छितात. त्यासाठी ते प्रचार मोहीमही राबवत आहेत. अॅपदेखील याच मोहिमेचा एक भाग आहे. अॅप मीडिया सीईओ व माजी जीओपी डेव्हिन नून्स म्हणाले, लोकांना त्यांचा आवाज परत करणे असा ट्रम्प यांचा उद्देश आहे. मार्चअखेरपर्यंत हे अॅप पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. बंदीपूर्वी ट्रम्प यांनी ६० हजार ट्वीट केले होते. तेव्हा त्यांचे ९ कोटी फॉलोअर्स होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.