आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही कोट्यवधी डॉलरची कमाई करत आहेत. ते व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय असलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्यासोबत चहा पिण्याचा दर ३७ लाख रु. आहे. एखाद्या समर्थकास त्यांच्यासोबत फोटो काढायचा असल्यास २२ लाखापर्यंत खर्च करावा लागेल. ट्रम्प यांनी गेल्या एक वर्षात कॉफी टेबल बुकद्वारे सुमारे ५०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्याआधीपासूनच श्रीमंत होते. रिअल इस्टेट, गोल्ड बार, फायनान्स आणि अन्य अनेक व्यवसायांचे संचालन करत होते.
हे व्यवसाय जगभर पसरले आहेत. मात्र, माजी राष्ट्राध्यक्षाच्या रूपात त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. डिसेंबरच्या ख्रिसमस इव्हेंटमध्ये कोट्यवधी कमावले आहेत. ही सर्व फंड रेजिंगमधून होणारी कमाई ट्रम्प यांच्या राजकीय मोहिमांसाठी जात नाही. म्हणजे, निधी रिपब्लिकन पक्षाच्या खात्यात न जाता ट्रम्प यांच्याकडे राहतो. ट्रम्प यांच्या एका इव्हेंटमध्ये आलेल्या डॅनियल पोपस्क्यू म्हणाले की, ट्रम्प बारमध्ये तुम्हाला ड्रिंक महाग मिळेल. मात्र, येथे येऊन तुम्ही अमेरिकेच्या एका महान माजी राष्ट्राध्यक्षासोबत आहात हा दिलासा मिळतो. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा बुक रॉयल्टी, बिल क्लिंटन , जॉर्ज बुश भाषणातून पैसा कमावतात.
मेक अमेरिका ग्रेट अनेगन कॅप व टी-शर्टची मागणी
ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेनची ओळ असणाऱ्या टोपी आणि टी-शर्टाला सर्वाधिक मागणी आहे. ३७०० रुपयांची ही टोपी हातोहात विकली जाते. टेक्सास-अॅरिझोनामध्ये या वर्षी ट्रम्प यांच्या सभांमध्ये मोठ्या स्क्रीनवर प्रॉडक्ट प्रमोशन झाले. ट्रम्प ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष एरिक ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प अद्यापही लोकप्रिय नेते आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.