Donald Trump Court Appearance; Melania Trump, Ivanka | US New York News
कुटुंब ट्रम्प यांच्यासोबत दिसले नाही:न्यूयॉर्क ते फ्लोरिडापर्यंत पत्नी मेलानिया सोबत नव्हत्या, कन्या इव्हांका व जावई सुटीवर
2 महिन्यांपूर्वी
कॉपी लिंक
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी न्यूयॉर्क कोर्टात हजेरी लावत असताना आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या पत्नी मेलानिया त्यांच्यासोबत हजर राहिल्या नाही. इतकेच नाही तर व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या माजी राष्ट्राध्यक्ष सल्लागार राहिलेल्या कन्या आणि जावईही त्यांच्या सोबत नव्हते. कन्या इवांका आणि जावई गेरार्ड कुश्नर वायोमिंगमध्ये सुट्या घालवत होते.
आता एवढ्या मोठ्या प्रकरणाचा सामना करताना कुटुंबाने ट्रम्प यांना एकटे सोडले का, असा प्रश्न अमेरिकन मीडियातील एक वर्गातून उपस्थित केला जात आहे. 2020 मध्ये, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की मेलानिया आणि ट्रम्प यांचे संबंध बिघडले आहेत आणि ते घटस्फोट घेऊ शकतात. विशेष म्हणजे ट्रम्प आणि मेलानिया यांनी यावर काहीही भाष्य केले नव्हते.
ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका पती आणि मुलांसह वायोमिंगमध्ये सुट्टी घालवत आहेत.
मंगळवारी हजर झाले
मंगळवारी मॅनहॅटन कोर्टात ट्रम्प यांच्यावर 34 आरोप निश्चित करण्यात आले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देणे आणि निवडणूक प्रचारादरम्यान बिझनेस रेकॉर्डमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फौजदारी खटला चालवला जात आहे.
ट्रम्प यांनी न्यायालयात स्वत:ला निर्दोष म्हटले. ते म्हणाले - मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्या जामीन किंवा अटकेवर निर्णय दिला नाही. पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे.
सुनावणीच्या एक दिवस आधी, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ट्रम्प फ्लोरिडाहून न्यूयॉर्कला रवाना झाले. ते न्यूयॉर्कमधील त्यांच्या ट्रम्प टॉवरमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. 57 मिनिटांच्या सुनावणीनंतर दुपारी 12.30 वाजता फ्लोरिडाला रवाना झाले. येथे त्यांनी त्यांच्या मार-ए-लागो या घरातून रात्री 8.15 वाजता भाषण केले.
इव्हांकांनी पती गेरार्ड आणि त्यांच्या तीन मुलांसोबत हे छायाचित्र गेल्या वर्षी पोस्ट केले होते.
मेलानिया दुसऱ्यांदा अनुपस्थित
मेलानिया माजी राष्ट्राध्यक्षांसोबत न दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी संसदेवर झालेल्या हल्ल्याबाबत ट्रम्प मीडियाशी बोलत असतानाही मेलानिया त्यांच्यासोबत नव्हत्या. यानंतरही त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.
मंगळवारीही मेलानिया पतीसोबत दिसल्या नाही. त्यांच्या गैरहजेरीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण न्यायालयात हजर झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपण ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या निमित्ताने कुटुंब एकत्र दिसेल, असा अंदाज होता.
पत्नीशिवाय कन्या इव्हांका आणि जावई गेरार्डही तिथे नव्हते. दोघे वायोमिंगमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. काही वृत्तांनुसार, इव्हांका आणि गेरार्ड यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते.
गेल्या महिन्यात, जेव्हा ट्रम्प यांनी एका कार्यक्रमादरम्यान 2024 मध्ये पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हाही इव्हांका आणि त्यांचे पती ट्रम्प यांच्यासोबत नव्हते. अशा परिस्थितीत, असे मानले जाते की कुटुंबात सर्व काही ठीक नाही.
2020 मध्ये, दोन माजी ट्रम्प सहाय्यकांनी दावा केला की मेलानियांना घटस्फोट हवा आहे.
याआधीही घटस्फोटाचे अंदाज लावले गेले
2020 मध्ये, ट्रम्प यांच्या माजी सहाय्यक स्टेफनी वोल्कोफने दावा केला होता की मेलानिया आणि ट्रम्प विवाहानंतरच्या समझोत्यावर वाटाघाटी करत आहेत. मेलानियांना हे जाणून घ्यायचे होते की घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा बॅरॉनला ट्रम्प यांच्या मालमत्तेपैकी किती रक्कम मिळेल. मेलानिया आणि ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये वेगळे राहत होते आणि त्यांचे नाते केवळ नावापुरतेच असल्याचा दावाही वोल्कॉफ यांनी केला होता.
आणखी एक माजी सहाय्यक ओमारोसा मॅनिगॉल्ट म्हणाले होते - ट्रम्प-मेलानियांचे लग्न जवळपास संपले आहे. एकेकाळी मॉडेल असलेल्या मेलानिया मूळच्या स्लोव्हेनियन आहे. त्यांनी 2005 मध्ये ट्रम्प यांच्याशी लग्न केले होते.
2024 मध्ये ट्रम्प पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया त्यांच्या निर्णयावर खूश नसल्याचे वृत्त आहे. ट्रम्प निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर मेलानिया त्यांना साथ देणार नाहीत, असा दावा केला जात आहे. माजी फर्स्ट लेडी व्हाईट हाऊसमध्ये घालवलेला वेळ विसरू इच्छित असल्याचा दावा सीएनएनने मेलानियांच्या जवळच्या स्त्रोताचा हवाला देत केला आहे. त्यांना व्हाईट हाऊसमध्ये परतायचे नाही. यामुळेच ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवू नये अशी त्यांची इच्छा आहे.