आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प सुपरहिरो-अ‍ॅस्ट्रोनॉटच्या वेशात:अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी पैसे कमावण्यासाठी जारी केले स्वतःचे डिजिटल कार्ड्स

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्प यांनी कार्ड्स जारी करण्यापूर्वी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी अमेरिकेला एका सुपरहिरोची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.  - Divya Marathi
ट्रम्प यांनी कार्ड्स जारी करण्यापूर्वी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी अमेरिकेला एका सुपरहिरोची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचे डिजिटल कार्ड्स जारी केलेत. त्यात ते सुपरहिरो व अंतराळपटूंच्या कॉस्ट्यूममध्ये दिसून येत आहेत. या कार्ड्सची किंमत 99 डॉलर्स म्हणजे 8 हजार रुपये आहे. त्यांची विक्री करण्यासाठी ट्रम्प वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत आहेत.

ट्रम्प यांच्या मते, हे कार्ड्स अधिकाधिक करणाऱ्या व्यक्तींना मी स्वतः भेटेल. व्हिडिओ कॉल करेल, ऑटोग्राफ करेल. विशेषतः त्याच्यासोबत गोल्फही खेळेल. एवढेच नाही तर 45 कार्ड्स खरेदी करणाऱ्या लोकांना माझ्या साउथ फ्लोरिडा स्थित रिसॉर्टमध्ये एंट्री व पार्टीही मिळेल, असे ते म्हणाले. या कार्ड्सच्या विक्रीतून मिळणारे पैसे ट्रम्प स्वतःकडे ठेवतील. त्याचा निवडणुकीच्या प्रचारात वापर करणार नाहीत.

हे ट्रम्प यांच्या डिजिटल ट्रेडिंग कार्ड कलेक्शनचे छायाचित्र आहे. त्यांनी अधिकाधिक कार्ड्स खरेदी करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची घोषणा केली आहे.
हे ट्रम्प यांच्या डिजिटल ट्रेडिंग कार्ड कलेक्शनचे छायाचित्र आहे. त्यांनी अधिकाधिक कार्ड्स खरेदी करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची घोषणा केली आहे.

लोक म्हणाले - सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न

  • नारिकांनी ट्रम्प यांच्या योजनेची थट्टा उडवत हे बालिश कृत्य असल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा करण्यापूर्वी 826 कोटींचा फंड गोळा केला होता. पण स्वतःची उमेदवारी बळकट करण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला नव्हता.
  • सोशल मीडियावर एक युजर म्हणाला - ज्या व्यक्तीने ट्रम्प यांना असे करण्याचा सल्ला दिला, त्याची नोकरीवरून हकालपट्टी केली पाहिजे. अन्य एक युजर म्हणाला - नागरिकांना देशाची प्रगती हवी आहे. त्यातच ट्रम्प मोठी घोषणा करण्याची गोष्ट करतात. त्यानंतर ते स्वतःचे डिजिटल ट्रेडिंग कार्ड कलेक्शन रिलीज करतात. ही एक प्रकारची थट्टा आहे. अशा कृत्यांमुळे मतदार त्यांच्यापासून दूर जातील.
  • काही लोकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका केली आहे. कारण, 2024 ची अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर माध्यमांनी ट्रम्प यांना प्रसिद्धी दिली नव्हती.
बातम्या आणखी आहेत...