आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump| FBI Urged US Police Chiefs Across The Country To Be On High Alert As Donald Trump Supporters May Create Unrest.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका हायअलर्टवर:FBI चे सर्व राज्यांच्या पोलिस प्रमुखांसाठी बुलेटिन जारी, म्हटले -'धोका खूप मोठा आहे, सतर्क राहा'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सने बुधवारी रात्री राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पवर महाभियोगच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

अमेरिकेत फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) ने सर्व 50 राज्यांच्या पोलिस प्रमुखांना एक बुलेटिन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, 20 जानेवारीला प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारोहमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा होण्याची शक्यत ाआहे. अमेरिकेची सर्वात मोठी तपास एजेंसीने बुलेटिनमध्ये म्हटले - 20 जानेवारीच्या पूर्वी आणि काही दिवसांनंतरपर्यंत सर्वत हायअलर्टवर राहा. कट्टरपंथी हिंसा पसरवू शकतात. काही दिवसांपूर्वी CNN ने तपास एजेंसीच्या सूत्रांच्या हवाल्याने अशाच प्रकारच्या अलर्टचा रिपोर्ट दिला होता. नंतर होमलँड सिक्योरिटी डिपार्टमेंटने याची पुष्टी करण्यास नकार दिला होता. आता FBIने स्वतः बुलेटिन जारी करुन सांगितले आहे की, धोका किती मोठा आहे.

इंटेलिजेंस रिपोर्ट्स मिळाले
'न्यूयॉर्क टाइम्स' च्या एका रिपोर्टनुसार, FBI डायरेक्टर क्रिस्टोफर वेरी आणि होमलँड सिक्योरिटी केनेथ कुसनेली यांनी बुधवारी एक मोठी मीटिंग केली. याच्या काही वेळानंतर दुसऱ्या इंटेलिजेंस एजेंसीजचे चीफही या दोन्ही अधिकाऱ्यांना भेटले. संध्याकाळी पुन्हा एक मीटिंग झाली आणि याच्या काही वेळानंतर FBI ने हे बुलेटिन जारी केले. सुरक्षा आणि तपास यंत्रणांना मोठा धोका न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसी बद्दल आहे.

हिंसेची शक्यता वाढत आहे
हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सने बुधवारी रात्री राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पवर महाभियोगच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. तसेच याची खूप जास्त अर्थ काढले जाऊ नयेत. याचे कारण सभागृहात डेमोक्रॅट यांचे बहुमत आहे. तसेच महाभियोगाचा निर्णय सिनेटमध्ये होईल. आणि तेथे डेमोक्रॅट बहुसंख्य आहेत. डेमोक्रॅट दोन तृतीयांश बहुमत मिळवू शकतील अशी शक्यता आहे.

मात्र यामुळे श्वेत कट्टरपंथी आणि ट्रम्प समर्थक प्रचंड नाराज आहेत. याच लोकांनी गेल्या आठवड्यात गुरुवारी संसदेच्या आत आणि बाहेर हिंसा केली होती. एक महिला आणि पोलिस अधिकाऱ्यासह पाच लोकांचा मृत्यू झाला होता. हाच गट पुन्हा हिंसा करु शकतो.

कोणत्या राज्यात धोका जास्त
FBI सूत्रांच्या हवाल्याने CNN ने वृत्त दिले आहे की, अशा राज्यांमध्ये खूप जास्त धोका आहे जिथे रिपब्लिकन पार्टीचे सरकार आणि गव्हर्नर आहे. खरेतर अमेरिकेमध्ये राजकीय हिंसेच्या घटना खूप कमी किंवा होतच नाहीत. मात्र अशा अनेक संधी आल्या की, विरोध प्रदर्शनदरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ उडाला. मागच्या गुरुवारीही असेच झाले होते. यानंतर FBI या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत 33 लोकांना अटकही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...