आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये स्पीकर निवडण्यासाठी सलग 15 वेळा मतदान झाले. ज्यानंतर केविन मॅकार्थी यांची स्पीकर म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे. जिथे सलग इतके दिवस सभापती निवडीसाठी मतदान करण्यात आले.
दरम्यान, सभागृहाचे सदस्य मॅट गॅजेट यांनी स्पीकरसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव पुढे केले. ट्रम्प यांना मतदान करणारा तो एकमेव व्यक्ती होता. सभागृहात ही घोषणा होताच सदस्यांना हसू आवरता आले नाही आणि ते सगळे हसू लागले.
विजयानंतर जो बायडेन यांनी केले अभिनंदन
रिपब्लिकन केविन मॅकार्थी यांना स्पीकर म्हणून निवडण्यासाठी 15 फेऱ्यांचे चार दिवस मतदान झाले. यामध्ये त्यांना 428 पैकी 216 मते मिळाली. तर 212 सदस्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हकीम जेफरीज यांना मतदान केले. अध्यक्ष जो बायडेन यांनी मॅककार्थी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे.
मॅकार्थीच्या नावावर पक्षातच एकवाक्यता नव्हती
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले आहे. 435 जागांपैकी रिपब्लिकन पक्षाला 222 तर डेमोक्रॅटिक पक्षाला केवळ 213 जागा मिळाल्या.
अशा स्थितीत रिपब्लिकन पक्ष आपला स्पीकर सहज निवडेल, असे मानले जात होते. मात्र, असे होत नव्हते. पक्ष स्वतःच आपला उमेदवार केविन मॅकार्थी यांना स्पीकर म्हणून निवडण्यात एकजूट नव्हता. त्यांना झालेल्या 14 मतदान फेरीत बहुमत मिळू शकले नाही.
डेमोक्रॅटच्या पराभवानंतर नॅन्सी पेलोसी यांनी सभापतीपदाचा दिला राजीनामा
प्रतिनिधी सभेत डेमोक्रॅट्सच्या पराभवानंतर अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी अध्यक्ष आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावरून राजीनामा दिला
82 वर्षीय पेलोसी म्हणाल्या होत्या - मला डेमोक्रॅटिक पक्षाच्या तरुण नेत्यांना संधी द्यायची आहे. मी कोणत्याही दावेदारांना पाठिंबा देणार नाही. सर्व दावेदारांची स्वतःची योजना असेल, स्वतःची दृष्टी असेल.
पेलोसीने तैवानला भेट देऊन जगाचे वेधून घेतले लक्ष
नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपूर्वी तैवानमध्ये जाऊन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. चीनच्या इशाऱ्यानंतरही झालेल्या या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पेलोसी यांनी अमेरिकेतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी तैवानला भेट दिल्याचे मानले जात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.