आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump Income Tax Update | This Is How Much Tax Paid By US President Donald Trump? All You Need To Know

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची टॅक्स चोरी:ट्रम्प यांनी 2017 मध्ये अमेरिकेत केवळ 55 हजार रु. टॅक्स दिला, याचवर्षी त्यांच्या कंपनीने भारतात भरला 1.07 कोटींचा टॅक्स

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांनी गेल्या 15 वर्षांमधून 10 वर्षे टॅक्स जमा केला नाही, स्पष्टीकरण देताना म्हणाले - कमाईपेक्षा जास्त नुकसान आहे
  • 1970 च्या दशकानंतर ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष बनले ज्यांनी आपले टॅक्स रिटर्न सार्वजनिक केले नाही

'द न्यूयॉर्क टाइम्स' ने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर चोरीवर खुलासा केला आहे. अहवालानुसार, ट्रम्प यांनी 2016 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये पोहचले तेव्हा (आर्थिक वर्ष 2016-17) 750 डॉलर (सुमारे 55,000 रुपये) कर भरला होता. दरम्यान, त्यांच्या कंपनीने भारतात 1,45,400 डॉलर (सुमारे 1.07 कोटी रुपये) कर भरला. आता जेव्हा ट्रम्प दुसऱ्यांदा निवडणूक क्षेत्रात रिंगणात उतरले आहेत, तेव्हा कर भरण्याशी संबंधित मुद्दा पुढे आला आहे.

रिपोर्टनुसार गेल्या 15 वर्षांमधून 10 वर्षे त्यांनी कोणताही टॅक्स जमा केलेला नाही. यावर ट्रम्पकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, त्यांनी जेवढे कमावले, त्यापेक्षा जास्त त्यांचे नुकसान झाले आहे.

ट्रम्प न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल बनावट असल्याचे म्हटले
न्यूयॉर्क टाइम्सचा हा अहवाल ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. प्रत्येक वेळी प्रमाणे ते म्हणाले की ही बनावट बातमी आहे. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने त्यांचे वैयक्तिक आर्थिक तपशील जाहीर करणे आवश्यक नाही, परंतु रिचर्ड निक्सन (1969-74) ते बराक ओबामा (2008-16) पर्यंत राष्ट्रपतींनी वैयक्तिक वित्तीय लेखा-जोखा जारी केला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न देण्यास नकार देऊन ट्रम्प यांनी ही परंपरा मोडली. 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचे कर परतावा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, त्यांच्या संपूर्ण कार्यकाळादरम्यान हा मुद्दा देखील चर्चेत राहिला.

डिबेटपूर्वी आला रिपोर्ट
NYT चा हा रिपोर्ट राष्ट्रपती निवडणुकीसाठी होणाऱ्या पारंपारिक प्रेसिडेंशियल डिबेटच्या ऐनपूर्वीच आला. पहिले डिबेट 29 सप्टेंबरला ओहियोमध्ये होणार आहे. दूसरी डिबेट 15 अक्टोबर आणि तिसरी 22 अक्टोबरला होणार आहे. याच काळात डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडेन यांच्या कँपेनने या रिपोर्टवरुन ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

डेमोक्रेट्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प यांच्या या वागण्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले की, 1970 च्या दशकानंतर ट्रम्प पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांनी आपले टॅक्स रिटर्न सार्वजनिक केले नाही. कायदेशीररित्या असे करणे गरजेचे नाही, मात्र ट्रम्प यांनी अमेरिकेची परंरपरा मोडली आहे.

बातम्या आणखी आहेत...