- Marathi News
- International
- Donald Trump Joe Biden| Donald Trump Supporters Protest In US Capitol Hill Washington Joe Biden Elections Photo Story
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फोटोमध्ये अमेरिकेची हिंसा:लाल टोपी, निळे झेंडे घेऊन आलेल्या ट्रम्प समर्थकांनी कोणाचे डोके फोडले तर कुणी भिंतीवरुन खाली पडले
- ट्रम्प यांचे बहुतेक समर्थक लाल टोपी आणि निळ्या कपड्यांमध्ये पोहोचले.
अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होणार होता. त्याआधी ट्रम्प यांचे हजारो समर्थक अमेरिकन संसद भवन (यूएस कॅपिटल हिल) समोर जमले. ते निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी करत होते. या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. ट्रम्प यांचे बहुतेक समर्थक लाल टोपी आणि निळ्या कपड्यांमध्ये पोहोचले. हे दोन रंग ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ध्वजाचे रंग आहेत. हिंसाचार करणाऱ्यांच्या हातात निळे बॅनर होते, ज्यावर - KEEP AMERICA GREAT असे लिहिले होते. म्हणजेच अमेरिकेला महान बनवून ठेवा.
अमेरिकेची संसद बिल्डिंग यूएस कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थक. त्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी केली. नंतर सुरक्षारक्षकाने त्यांना हटवले.
पोलिस फोर्सने ट्रम्प समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकले नाही तर लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये काही आंदोलकांचे डोके फुटले.
काही समर्थक यूएस कॅपिटल बिल्डिंगच्या बाजूला पाइपने बनवलेले अस्थाई ढाच्यांवर चढले. त्यावर झाकलेला कपडा फाडला.
ट्रम्प समर्थकांनी रिपब्लिकन पार्टीच्या झेंड्याच्या रंगांचे कपडे घातले होते.
ट्रम्प समर्थक 2020 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर नाराज आहेत. यामध्ये ट्रम्प यांचा पराभव झाला.
हे अमेरिकेचे संसद भवन, म्हणजेच काँग्रेसची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगला यूएस कॅपिटल हिल म्हटले जाते. हजारो आंदोलक यावर चढले.
ट्रम्प समर्थकांनी बिल्डिंगची तोडफोड केली. ते पोलिसांना भिडले. जवाबी कारवाईत पोलिसांना लाठ्या चालवाव्या लागल्या.
आंदोलकांनी ऐकले नाही तर सुरक्षारक्षकांनी अश्रू गॅसचे गोळेही सोडले.
सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना पहिले बॅरिकेड लावून रोखले, मात्र त्यांनी बॅरिकेड तोडले.
मॅरीलँडचे रिप्रेजेंटेटिव्ह डेविड ट्रोन यूएस कॅपिटल हिल बिल्डिंगमध्ये स्वतःला अशा प्रकारे मास्कने कव्हर केलेले दिसले.
ट्रम्प समर्थकांच्या हातात KEEP AMERICA GREAT लिहिलेले बॅनर होते.
ट्रम्प समर्थक यूएस कॅपिटल हिल बिल्डिंगच्या आतपर्यंत पोहोचले होते.