आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump Joe Biden News LIVE | US Election 2020 Results Day 3 Updates; Read Latest US Presidential Election Today Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US इलेक्शन:17 मिनिटे खोट्या दाव्यांसह निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत राहिले ट्रम्प, वृत्तवाहिन्यांनी लाइव्ह टेलिकास्ट केले बंद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा व्हाइट हाऊसमधून वक्तव्य केले.

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या तीन दिवसांनंतरही निकाल स्पष्ट होऊ शकलेले नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हार मानायला तयार नाहीत. ते काउंटिंग रोखण्याची मागणी करत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, बायडेन यांना आतापर्यंत 253 आणि ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी 270 चा जादूई आकडा आवश्यक आहे.

ट्रम्प यांच्या भाषणाचा लाइव्ह टेलीकास्ट थांबवण्यात आले
निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा व्हाइट हाऊसमधून वक्तव्य केले. हे कव्हर करण्यासाठी मीडियाही तिथे होते. ट्रम्प यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा ते खोटे दावे करु लागले. त्यांनी म्हटले, 'निवडणुकांचे निकाल माझ्याविरोधा सुरू असलेले कारस्थान आहे. डेमोक्रेट्सला अवैध वोट मिलत आहे. ते माझ्याकडून निवडणुकीतील विजय खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर लीगल वोट्सची मोजणी केली गेले तर मी सहज जिंकेल. अजुनही बॅलेट्स मोजले जात आहे, म्हणजेच निवडणुकीत घोळ होत आहे. सीक्रेट काउंटिंग सुरू आहे.'

ट्रम्प यांनी आरोपांच्या समर्थनात कोणताही पुरावा दिलेला नाही. ते 17 मिनिट बोलले आणि अशाच प्रकारचे खोटे दावे करत राहिले. अमेरिकेच्या तीन प्रमुख न्यूज चॅनलचे ABC, NBC आणि CBS ने याला देशाची स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेविरोधात मानले आणि व्हाइट हाऊसमधून लाइव्ह कव्हरेज थांबवले.