आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump Joe Biden | US Election Results Latest News, Biden Breaks Obama's Record, More Than 7 Million Votes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका निवडणूक:निकाल लागण्यापुर्वीच बायडेन यांचा विक्रम, ​​​​​​​आतापर्यंत 7 कोटींपेक्षा जास्त मते; हे इतिहासात सर्वात जास्त, ओबामांचाही विक्रम मोडला

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 वर्षांपूर्वी बायडेन यांच्या पक्षाच्या ओबामा यांना 6.94 कोटी वोट मिळाले होते
  • बायडेन यांना 7.10 कोटी मते मिळाली आहेत, मतमोजणी अजुनही सुरूच आहे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक कोण जिंकेल? जो बायडेन की डोनाल्ड ट्रम्प? याचे उत्तर आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. सध्या बायडेन यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, ते 253 इलेक्टोरल वोट जिंकले आहेत. ट्रम्प यांच्या खात्यात 214 वोट आहेत. बायडेन यांनी आपल्या पक्षाचे बराक ओबाना यांचा 12 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत बायडेन 7 कोटी 10 लाख पॉपुलर वोट मिळाले होते. 2008 मध्ये ओबामांना 6 कोटी 94 लाख 98 हजार 516 मते मिळाली होती.

The Guardian नुसार, ट्रम्प यांना 270 चा जादुई आकडा पार करण्यासाठी 53 इलेक्टोरल मते हवी आहेत. 4 राज्यांमध्ये मतमोजणी अजुनही सुरू आहे. जर यामध्ये तीन (याची शक्यताही आहे) ट्रम्प यांना मिळाले तर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. पेन्सिलवेनिया यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. तर बायडेन एकटे पेन्सिलवेनिया जिंकून बहुमतापर्यंत पोहोचू शकतात. जर पेन्सिलवेनियामध्ये विजय मिळाला नाही तर बायडेन आपला गड नेवादा, जॉर्जिया आणइ नॉर्थ कॅरोलिनाच्या माध्यमातून व्हाइट हाउसपर्यंत पोहोचू शकतात. मात्र यामध्ये नेवादा वगळता प्रत्येक ठिकाणी ट्रम्प यांचा दबदबा आहे.

ट्रम्प पराभूत झाले का?
बायडेन यांना जास्त मते मिळाली असली तरीही न्यूयॉर्क टाइम्सचे पॉलिटिकल एक्सपर्ट एडम नार्गोनी ट्रम्प यांना बरखास्त न करण्याचा सल्ला देतता. त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांचा विजय अशक्य नाही. एरिजोना, जॉर्जिया आणइ पेन्सिलवेनियाचे संपूर्ण निकाल लागू द्या. ते पुन्हा एकदा सर्वांना हैराण करु शकतात. ट्रम्प सातत्याने मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. काउंटिंगदरम्यान त्यांनी ट्विट करत पेनसिल्वेनियामध्ये पाच लाख मते गायब झाल्याचा दावा केला.