आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump Joe Biden | US Election Results Latest News, Donald Trump Joe Biden Election Day 2020 Live

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US निवडणूक LIVE:वोटिंग रोखण्यासाठी ट्रम्प सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत; डेमोक्रेट्सला 227, रिपब्लिकन्सला 213 इलेक्टोरल वोट्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी काउंटिंग सुरू आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, आतापर्यंतच्या आकडेवारीत बायडेन यांना 227, तर ट्रम्प यांना 213 इलेक्टर्स मतं मिळाले आहेत.जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल वोट्स हवेत आहेत, मात्र यावेळी प्रकरण अडकणार असल्याचे दिसत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण - अजुनही मोठ्या प्रमाणात बॅलटची मोजणी होणे बाकी आहे. दुसरे कारण म्हणजे - ट्रम्प यांनी विजयाची एकतरफी घोषणा केली आहे. ते म्हणतात की, आम्ही जिंकलो आहोत, तर आता सर्व वोटिंग थांबायला हवी. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ.

सर्वात महत्त्वाचे स्विंग स्टेट फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांचा विजय
यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प 29 इलेक्टर्सच्या सर्वात महत्त्वाचे स्विंग स्टेट फ्लोरिडामध्ये विजय कायम ठेवण्यात यशस्वी झाले. असे म्हटले जाते की, या स्विंग स्टेटमध्ये जो जिंगतो, तोच व्हाइट हाउसमध्ये पोहोचतो. 100 वर्षांचा हा इतिहास आहे. NBC च्या एग्जिट पोलनुसार फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या लॅटिन अमेरिकी वोटर्स ट्रम्प यांच्यासोबत होता. क्यूबा वंशाचे 55%, प्यूर्टोरिकोचे 30% आणि 48% इतर लॅटिन अमेरिका मुळचे वोटर ट्रम्प यांच्या सोबत होते. यामुळेच त्यांना आतापर्यंत एकूण 51.6% मते मिळाली.

Updates :

  • न्यू जर्सीमध्ये 14 इलेक्टोरल वोट्स आहेत. येथे 1 लाखांपेक्षा जास्त गुजराती मतदार आहेत. येथे ट्रम्प पराभूत झाले आहेत. 22 राज्यांमध्ये ट्रम्प यांचा विजय निश्चित आहेत. 5 मध्ये ते लीडवर आहेत.
  • तर कॅलिफॉर्निया (55 इलेक्टर्स) सह 11 राज्यांमध्ये बायडेन यांचा विजय निश्चित आहे, 3 मध्ये ते आघाडीवर आहेत.
  • सीनेटमध्ये आतापर्यंत डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन्सने 47-47 सीट जिंकले आहेत. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह्समध्ये डेमोक्रेट्स 189 आणि रिपब्लिकन्सने 181 सीट जिंकले आहेत.

ट्रम्प-बायडेन यांचे दावे

दरम्यान बायडेन यांनी लोकांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, सध्या आपण जिथे उभे आहोत, त्यावरुन खूप आनंदी आहे. विस्कॉन्सिन आणि मिशिगनमधून मिळणाऱ्या बातम्या ऐकूण चांगले वाटत आहे. जोपर्यंत प्रत्येक बॅलेटची मोजणी होत नाही, तोपर्यंत निवडणूक संपत नाही.

ट्रम्प यांनी ट्विट केले, 'आपण उंचीवर जात आहोत, पण ते (डेमोक्रेट्स) जनमतावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत असे होऊ देणार नाही. एकदा मतदान संपल्यावर कुणीही वोट टाकू शकत नाही.' ट्रम्प म्हणाले की, ते देखील लोकांना संबोधित करणार आहेत.

बायडेन यांच्यानंतर ट्रम्प यांनी अर्ध्या रात्री लोकांना संबोधित केले. ते म्हणाले - 'यापुर्वी मी कोणत्याही प्रकरणावर लवकर प्रेस कॉन्फ्रेंस घेतली नाही. आपण प्रत्येक गोष्टीत विजय मिळवला आहे. यानंतर अचानक सर्व बंद झाले. (पण ते कोणती गोष्ट बंद करण्याविषयी बोलत आहे हे त्यांनी सांगितले नाही) फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये आपल्याला जबरदस्त विजय मिळाला आहे. शानदार समर्थनसाठी मी अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानतो.'

'काही दुःखी लोक निकाल रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांची साथ देऊ शकत नाही. जो निकाल आला आहे, तो चांगला आहे. रात्री काउंटिंग करण्याचे काय कारण आहे. याविषयी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. माझ्या हिशोबाने आपण निवडणूक जिंकलो आहोत.'

72 वर्षांनंतर एरिजोना डेमोक्रेट्सचा : CNN नुसार, यावेळी रिपब्लिकन्सचा गड मानला जाणारा एरिजोनामध्ये डेमोक्रेट्सने ताबा मिळवला आहे. येथे बायडेन यांनी चांगले मत मिळवले आहेत. एरिजोनामध्ये या उलथापालथीचे कारण म्हणजे लॅटिन लोक असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांना घुसखोर म्हणतात. तर बायडेन यांनी त्यांचे समर्थन केले आहे. याचा निकाल समोर आहे. 2016 मध्ये ट्रम्प यांनी येथे 3% जास्त वोट मिळवले होते. यावेळी एवढ्या मतांनी ते मागे आहेत.