आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट सुनावणी:सरेंडरसाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले डोनाल्ड ट्रम्प, कोर्टरूममध्ये व्हिडिओग्राफीवर बंदी; फ्लोरिडात पत्रपरिषद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर आणि नंतर तिचे तोंड बंद करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ते मंगळवारी कोर्टात हजर राहणार आहे. दुपारी 12:20 च्या सुमारास ट्रम्प फ्लोरिडातील त्यांच्या मार-ए-लागो घरातून बाहेर पडले.

त्यानंतर ते प्रायव्हेट जेटने सुमारे 15.50 वाजता न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरवर पोहोचले. वृत्तसंस्था AP ने दिलेल्या माहितीनुसार, सुनावणीनंतर ट्रम्प फ्लोरिडा येथे परतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.

मॅनहॅटन कोर्टात सुनावणीदरम्यान व्हिडिओग्राफीवर बंदी घालण्यात आलेली आहे. कार्यवाही सुरू होण्यापूर्वी स्टिल फोटोग्राफर्सच्या पाच गटांना काही मिनिटे छायाचित्र क्लिक करण्याची परवानगी दिली जाईल. निकाल देताना न्यायाधीश मार्चेन म्हणाले - अमेरिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल जेव्हा प्रथमच माजी राष्ट्राध्यक्षांवर फौजदारी आरोप लावले जातील. अशा परिस्थितीत आपण कोणत्याही वादाचा धोका पत्करू शकत नाही. कोर्टरूममध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी दिली जाणार नाही.

ट्रम्प यांनी व्हिडिओ-फोटोग्राफीवर बंदीची केली मागणी
यापूर्वी ट्रम्प यांच्या वकिलांनी शरणागती दरम्यान न्यायालयात व्हिडिओ किंवा फोटोग्राफीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. कोर्टाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते - ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटल्याबाबत देशात आधीच गोंधळाचे वातावरण झालेले आहे. अशा स्थितीत आत्मसमर्पणाचे मीडिया कव्हरेज आणखी वाईट संदेश देईल. त्यामुळे न्यायालयाची प्रतिष्ठा कमी होईल.

मार-ए-लागो ते ट्रम्प टॉवर या मार्गावर ट्रम्प यांचे समर्थक उपस्थित होते.
मार-ए-लागो ते ट्रम्प टॉवर या मार्गावर ट्रम्प यांचे समर्थक उपस्थित होते.

मार्गावर पोस्टर-बॅनर्ससह समर्थकांची गर्दी
मार-ए-लागो ते ट्रम्प टॉवर या मार्गावर ट्रम्प यांचे हजारो समर्थक उपस्थित होते. अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ बॅनर आणि पोस्टर्सही पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर ट्रम्प यांनी हस्तांदोलन केले आणि समर्थकांना संबोधित केले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प हे आपला उर्वरित वेळ या खटल्यासंदर्भात आपल्या वकिलांना भेटण्यात घालवतील. मंगळवारी, सीक्रेट सर्व्हिस एजंट आणि न्यायालयीन अधिकार्‍यांसह, ते प्रथम जिल्हा ऍटर्नी ब्रॅगच्या कार्यालयात आणि नंतर मॅनहॅटन कोर्टरूममध्ये आत्मसमर्पण करतील.

ट्रम्प संदर्भात दिव्य मराठीच्या या बातम्याही वाचा

ट्रम्प यांनी खटला लढवायला 24 तासांत उभारले 32 कोटी : व्हाइट हाऊसबाहेर समर्थक गोळा; सुरक्षेचा आढावा घ्यायला अधिकारी पोहोचले कोर्टहाऊसला

अमेरिकेचे येथे वाचा संपूर्ण बातमी

पाय खोलात:डोनाल्ड ट्रम्पवर चालणार फौजदारी खटला, प्रथमच माजी अध्यक्षांवर अशी केस; मंगळवारी सरेंडर करण्याची शक्यता

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालेल. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन ग्रँड ज्यूरींनी गुरुवारी त्यांच्यावर हा खटला चालवण्याचा निर्णय दिला. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टारशी असणारे अफेअर व तिला शांत राहण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर हा खटला चालेल. अशा खटल्याचा सामना करणारे ट्रम्प अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरलेत. कोर्टाने त्यांच्यावर कोणते आरोप ठेवलेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी

पॉर्नस्टार स्टॉर्मी 2006 मध्ये ट्रम्प यांना भेटली : भेटी-गाठी, अफेअर आणि तोंड बंद ठेवायला 1 कोटी; प्रकरण अटकेपर्यंत कसे गेले?

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये, आपण डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनिएल्सशी संबंधित संपूर्ण कथा आणि ट्रम्प यांच्या अटकेनंतरची संपूर्ण परिस्थिती जाणून घेणार आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी