आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:मला जास्त भारतीयांचे समर्थन, कमला हॅरिस यांना उमेदवारी देऊन बायडन यांनी चुक केली- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंगटनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात आरोप-प्रत्यारोपने वेग घेतला आहे. डेमोक्रेट पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडन यांनी भारतीय-जमैकन कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनवले आहे. यावर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रीया दिली आहे. जो बायडन यांनी कमला हॅरिस यांना उमेदवारी देऊन चुक केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

कमला यांची आई भारतीय आणि वडील जमैकन आहेत.
कमला यांची आई भारतीय आणि वडील जमैकन आहेत.

बायडन यांचा निर्णय चुकला

शुक्रवारी मीडियाशी बातचीतदरम्यान ट्रम्प म्हणाले की- माझ्यामते कमला योग्य व्यक्ती नाही. डेमोक्रेट पार्टीचा हा निर्णय बायडन यांच्या उमेदवारीपेक्षाही खराब आहे. भारतीय नागरिकांची मते मिळण्यासाठी कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली असेल, तर हे चुकीचे आहे. कमलापेक्षा मला जास्त भारतीयांचे समर्थन आहे.

बातम्या आणखी आहेत...