आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सत्तेत आल्यास रशिया-युक्रेन युद्ध एका दिवसात थांबवू, असा दावा केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते.
युद्ध संपवून तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखू शकतो, असेही ते म्हणाले. खरे तर ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा आपली उमेदवारी सादर केली आहे. ते ठिकठिकाणी जाऊन अजेंडा सांगत आहेत.
पुन्हा दिसला ट्रम्प यांचा जलवा
अलजझीराच्या वृत्तानुसार, रिपब्लिकन पक्षाच्या परिषदेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांची मोहिनी पाहायला मिळाली. संपूर्ण कार्यक्रम एक प्रकारे ट्रम्प यांना समर्पित होता. ट्रम्प यांनी परिषदेत सांगितले की, आम्ही सुरू केलेली मोहीम शेवटपर्यंत नेली जाईल.
परिषदेच्या शेवटच्या दिवशी ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर सडकून टीका केली. त्यांनी आपल्या समर्थकांना वचन दिले की, ते अमेरिकेला कुरूप कम्युनिस्ट देश होण्यापासून वाचवतील. तसेच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची सर्व धोरणे संपवतील.
ट्रम्प यांना पर्याय शोधत आहे रिपब्लिकन
एकीकडे ट्रम्प पुन्हा त्यांच्या समर्थकांमध्ये आपली पकड मजबूत करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या जागी रिपब्लिकन पक्ष दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे ओपिनियन पोलमधून समोर आले आहे. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांना त्यांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मात्र, त्यांनी अद्याप आपला दावाही मांडलेला नाही.
भारतीय वंशाच्या निक्की हेलीनेही मांडला दावा
भारतीय वंशाच्या निक्की हेलीने 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आपली उमेदवारीही सादर केली. निक्की औपचारिक उमेदवार होण्यासाठी प्राथमिक निवडणूक लढवणार आहे.
51 वर्षीय निक्की या दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर होत्या. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी निक्कीला यूएनमध्ये अमेरिकेचे राजदूत बनवले होते. त्यादरम्यान विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सनेही निक्कीच्या कामाचे कौतुक केले होते.
अमेरिकेला मिळेल का भारतीय राष्ट्राध्यक्ष?
अमेरिकेत भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दावा केला आहे. अशा परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प आणि निक्की यांच्यात लढत होणार आहे.
दुसरीकडे, क्लासिफाइड डॉक्यूमेंट्सच्या वादामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन निवडणुकीतून माघार घेऊ शकतात. अशा स्थितीत विद्यमान व्हाइस प्रेसिडेंट कमला हॅरिस या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार असू शकतात. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.